नवी दिल्ली, 23 जानेवारी : फेसबुक
(Facebook) पॉप्युलर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. सध्या सोशल मीडियाचा
(Social Media) वापर झपाट्याने वाढला असल्याने प्रत्येकजण जवळपास सर्वच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. अशात कधीतरी पासवर्ड लक्षात ठेवणं कठीण होतं. अनेक जण फेसबुकवर अकाउंटवर
(Facebook Account) तर क्रिएट करतात, पण त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करत नाहीत. त्यामुळे पासवर्ड विसरल्याची, लक्षात नसल्याची समस्या येऊ शकते.
त्याशिवाय इतर काही कारणांमुळेही युजरला Facebook वर लॉगइन करण्यासाठी समस्या येऊ शकतात. जर तुमचं फेसबुकही एखाद्या कारणाने लॉगइन
(Facebook Login) होत नसेल, तुमचं जुनं फेसबुक अकाउंट अॅक्सेस करता येत नसेल, तर काही स्टेप्सने ते रिकव्हर करता
(Facebook Account Recover) येऊ शकतं. त्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
फेसबुकचं जुनं अकाउंट असं करा रिकव्हर -
- सर्वात आधी जे अकाउंट रिकव्हर करायचं आहे, त्यावर जा.
- त्यानंतर कव्हर फोटोजवळ किंवा खाली दिलेल्या तीन डॉट आयकॉनवर क्लिक करा.
- आता Find Support आणि Repot Profile ऑप्शन सिलेक्ट करा.
- त्यानंतर Something Else वर सिलेक्ट करा आणि Next वर क्लिक करा.
- आता Recover This Account साठी दिलेल्या ऑप्शनवर क्लिक करा.
- त्यानंतर पुढे सांगितल्यानुसार स्टेप्स फॉलो करुन अकाउंट रिकव्हर करा.
वरील स्टेप्स फॉलो करुन तुम्ही Android Phone वरुन फेसबुक अकाउंट रिकव्हर करण्यासह कंप्यूटरवरुनही अकाउंट रिकव्हर करू शकता. यासाठी एक-दोन स्टेप्स वेगळ्या फॉलो कराव्या लागू शकतात.
दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'फेक न्यूज'
(Fake News) आणि 'भारतविरोधी बातम्या'
(Anti-India News) पसरवणारी आणि पाकिस्तानातून चालवली जाणारी काही अकाउंट्स ब्लॉक करण्याचे निर्देश भारत सरकारने गुप्त माहितीच्या आधारे दिले आहेत.
सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, 35 यू-ट्यूब चॅनेल्स
(You Tube), दोन ट्विटर अकाउंट्स, दोन इन्स्टाग्राम अकाउंट्स, दोन वेबसाइट्स आणि एक फेसबुक अकाउंट ब्लॉक करण्याच्या सूचना माहिती व प्रसारण मंत्रालयाने
(Ministry of Information and Broadcasting) दिल्या आहेत. ही सर्व अकाउंट्स पाकिस्तानमधून
(Pakistan) ऑपरेट होत आहेत. भारतविरोधी बनावट बातम्या पसरवण्याचं काम या अकाउंट्सच्या माध्यमातून केलं जात असल्याचं निदर्शनास आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.