मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमचं Gmail Account हॅक तर नाही झालं? सोप्या स्टेप्सने असं तपासा, राहाल अलर्ट

तुमचं Gmail Account हॅक तर नाही झालं? सोप्या स्टेप्सने असं तपासा, राहाल अलर्ट

तुमच्या नकळत तुमच्या Gmail Account चा अॅक्सेस दुसऱ्याकडे असू शकतो आणि तुमचे डिटेल्स चोरी होऊ शकतात. परंतु आपले जीमेल डिटेल्स इतर कोणाकडे असतील, अशी चिंता असल्यास काही स्टेप्स फॉलो करुन तुम्ही तुमचं जीमेल अकाउंट हॅक (Gmail Account Hack) झालं आहे की नाही हे तपासू शकता.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 22 जानेवारी : कोरोना काळात सायबर क्राइममध्ये (Cyber Crime) मोठी वाढ झाली आहे. डिजीटल जगात सायबर सिक्योरिटीसंबंधी (Cyber Security) अनेक प्रकरणं दररोज पाहायला मिळतात. अशात सोशल मीडिया अकाउंट्स (Social Media Accounts), जीमेल अकाउंट्स (Gmail Accounts) सुरक्षित ठेवणं गरजेचं ठरतं. एखाद्या दुसऱ्या युजरकडेही तुमच्या नकळत तुमच्या Gmail Account चा अॅक्सेस असू शकतो आणि तुमचे डिटेल्स चोरी होऊ शकतात. परंतु आपले जीमेल डिटेल्स इतर कोणाकडे असतील, अशी चिंता असल्यास काही स्टेप्स फॉलो करुन तुम्ही तुमचं जीमेल अकाउंट हॅक (Gmail Account Hack) झालं आहे की नाही हे तपासू शकता.

गुगल पासवर्ड चेकअप अॅड-ऑन फीचरच्या (Google Password Checkup Add On Feature) मदतीने तुम्ही तुमचं जीमेल अकाउंट तपासू शकता. गुगल क्रोम वेब ब्राउजरवर (Google Chrome Web Browser) हे फीचर 2019 मध्ये जोडण्यात आलं होतं. याच फीचरच्या मदतीने तुमच्या अकाउंटची सिक्योरिटी, अकाउंट हॅक झालं की नाही याबाबत माहिती मिळवू शकता.

हे वाचा - सिक्रेट मीटींगमध्ये "या' डिव्हाइसेसवर बंदी, महत्वाची माहिती LEAK होण्याची शक्यता

- सर्वात आधी गुगल क्रोम ब्राउजरवर (Google Chrome Browser) फ्री पासवर्ड चेकअप सॉफ्टवेअर (Free Password Checkup) डाउनलोड करावं लागेल. इन्स्टॉल झाल्यानंतर क्रोम एक्सटेंशन तुमचे लॉगइन क्रेडेंशियल चेक करेल.

- जर तुमचा युजरनेम किंवा पासवर्ड (Username and Password) गुगल डेटा बेसमध्ये असलेल्या 4 कोटींपैकी कोणत्याही अशा पासवर्डशी मॅच करेल, जो लीक झाला आहे, तर अशावेळी सॉफ्टवेअर तुम्हाला अलर्ट करेल.

- त्यानंतर तुमच्या स्क्रिनवर एक मेसेज दिसेल. ज्यात तुम्हाला संबंधित वेबसाइटच्या पासवर्ड चेकअपची माहिती दिली जाईल. या फीचरच्या मदतीने तुम्ही ब्राउजरवर सेव्ह असणारा कोणताही पासवर्ड चेक करू शकता. इथे डेटा लीक होण्याची माहिती दिली जाईल.

- जर तुमचं अकाउंट हॅक झालं असेल, तर ते सुरक्षित करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. सर्वात आधी अकाउंट पासवर्ड बदलावा लागेल. केवळ Gmail चं नाही, तर असे सर्व पासवर्ड बदलावे लागतील, जे लीक झाले आहेत.

First published:
top videos

    Tags: Gmail, Google, Tech news