नवी दिल्ली, 23 जानेवारी : केंद्र सरकार लवकरच देशात डिजीटल अॅड्रेस कोड (DAC) आणत आहे. हे तुमच्या अॅड्रेसचा Aadhaar Link Unique Code असेल. यामुळे येणाऱ्या ऑनलाइन डिलीव्हरीसह अनेक सुविधा मिळतील. कुरियर किंवा डिलीव्हरी बॉय अचूक पत्ता असूनही योग्य ठिकाणी पोहोचू शकत नाही. अशावेळी Google Maps देखील कामाचं ठरत नाही. परंतु लवकरच सरकार यावर उपाय आणत असून देशातील प्रत्येक नागरिकासाठी यूनिक कोड (Unique Code) उपलब्ध केला जाईल.
या कोडच्या मदतीने लोक टाइप करुन किंवा QR Code प्रमाणे स्कॅन करुन घराचं अचूक लोकेशन शोधू शकतो. अशात अॅड्रेस सेव्ह करुन ठेवण्याची गरज लागणार नाही. संपूर्ण कामं या कोडच्या मदतीने पूर्ण केली जातील. म्हणजेच या कोडमध्ये तुम्ही डिजीटल मॅप्सदेखील (Digital Maps) पाहू शकता.
देशात सध्या 75 कोटीहून अधिक घरं आहेत. या सर्व घरांसाठी डिजीटल यूनिक कोड बनवला जाईल. DSC प्रत्येक घराच्या अॅड्रेसला Digital Authentication म्हणजेच सर्टिफाइड करेल. Digital Address Code बनवण्यासाठी देशातील प्रत्येक घर वेगवेगळं आयडेंटिफाय (Identify) केलं जाईल. तसंच अॅड्रेस जिओस्पेशल कोऑर्टिनेट्सशी (geospatial coordinates) लिंक केलं जाईल. यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या अॅड्रेसला नंबर्स आणि लेटर्स असणाऱ्या एका कोडशी कायमसाठी आयडेंटिफाय केलं जाऊ शकेल. हा एक कायमस्वरुपी कोड असेल.
घरासाठीचा Digital Unique Code एका PIN Code प्रमाणेच असेल. हा कोड घरासाठी डिजीटल को-ऑर्डिनेटप्रमाणे काम करेल.
काय होईल फायदा -
DAC अर्थात Digital Address Code द्वारे घराचं ऑनलाइन अॅड्रेस वेरिफिकेशन (Online Address Verification) केलं जाईल. ई-कॉमर्ससारख्या सर्विससाठी DAC मदतशीर ठरेल. तसंच सरकारी योजना लागू करण्यासाठी DAC फायदेशीर ठरेल. त्याशिवाय फ्रॉडच्या घटना रोखण्यासाठीही मदत होईल. प्रॉपर्टी, टॅक्सेशन, आपत्ती व्यवस्थापन, जनगणना आणि लोकसंख्या नोंदणीसाठीही याची मदत होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.