Home /News /technology /

Maharashtra: महिला पोलिसाचं Gmail hack करुन nude photo viral, कसं सुरक्षित ठेवाल तुमचं अकाउंट?

Maharashtra: महिला पोलिसाचं Gmail hack करुन nude photo viral, कसं सुरक्षित ठेवाल तुमचं अकाउंट?

एका महिला पोलिसांचं जीमेल अकाउंट हॅक (Gmail Account Hack) झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. जीमेल हॅक करुन महिला पोलिसाचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. हॅकिंगचे प्रकार रोखण्यासाठी जीमेल किंवा इतर सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. यासाठी सुरक्षेबाबतच्या काही गोष्टीं कटाक्षाने पाळणं आवश्यक आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 26 जुलै: इंटरनेट, सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोना काळात तर याच्या वापरात अधिकच वाढ झाली आहे. इंटरनेट, सोशल मीडियाचा वापर वाढला असताना, दुसरीकडे सायबर क्राईमच्या (Cyber Crime) प्रकरणातही वाढ झाली आहे. हॅकर्सकडून अनेकांचे बँक अकाउंट, सोशल मीडिया अकाउंट हॅक करुन फसवणुकीचे, ब्लॅकमेलिंगचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. अशा प्रकरणांबाबत सायबर क्राईम पोलिसांकडे अनेक तक्रारीही आल्या आहेत. पोलिसांकडून नागरिकांच्या अशा अनेक तक्रारी सोडवल्या जात असताना, एका महिला पोलिसांचं जीमेल अकाउंट हॅक (Gmail Account Hack) झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. जीमेल हॅक करुन महिला पोलिसाचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. हॅकिंगचे प्रकार रोखण्यासाठी जीमेल किंवा इतर सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. यासाठी सुरक्षेबाबतच्या काही गोष्टीं कटाक्षाने पाळणं आवश्यक आहे. सध्या वाढत्या ऑनलाईन फ्रॉडच्या (Online Fraud) काळात जीमेल हॅक होण्याचा धोका नाकारता येत नाही. जर जीमेलवर काही चुकीच्या अ‍ॅक्टिव्हिटी झाल्या किंवा काही अनोळखी बदल दिसले, तर अकाउंट धोक्यात असल्याचं समजू शकतं. कसं सुरक्षित ठेवाल तुमचं अकाउंट - - कोणत्याही ऑनलाईन अकाउंटच्या सेफ्टीमध्ये पासवर्डची (Password) मोठी भूमिका असते. प्रत्येक अकाउंटचा पासवर्ड वेगळा असावा. पासवर्ड मोठा असणं गरजेचं आहे. कमीत-कमी आठ कॅरेक्टर पासवर्डमध्ये असावेत. पासवर्डमध्ये वेगवेगळ्या अक्षरांचं कॉम्बिनेशन असणं आवश्यक आहे. यामुळे पासवर्ड स्ट्राँग होतो. - अकाउंटमध्ये मल्टी लेवल ऑथेंटिकेशन इनेबल्ड असावं. यामुळे पासवर्डची सुरक्षा आणखी मजबूत होण्यास मदत होते. त्याशिवाय युजरने आपला कम्प्यूटर, सॉफ्टवेअर इतर गोष्टी अपडेटेड ठेवाव्यात. - कोणत्याही सोशल मीडिया साईट्स, जीमेल किंवा बँकिंग संबंधी गोष्टींचा पासवर्ड ठेवताना त्यात कोणतीही पर्सनल माहिती असू नये. नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि इतर खासगी गोष्टी पासवर्ड म्हणून ठेऊ नयेत. Logout करायचं विसरलात? असं जाणून घ्या किती सिस्टममध्ये आजही ओपन आहे तुमचं Gmail Gmail Account कसं कराल रिकव्हर - - अकाउंट हॅक झाल्यास, सर्वात आधी अकाउंट रिकव्हरी पेजवर जा. ID, पासवर्ड टाका. - जर पासवर्ड आठवत नसेल, तर काही प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तर दिल्यानंतर अकाउंट परत मिळेल. - विचारले गेलेले प्रश्न सिक्योरिटीसंबंधी असतील, ज्याची उत्तर अकाउंट सेटअप करताना दिलेली असतील. - रिकव्हरीसाठी युजर आपल्या रिकव्हरी ईमेल किंवा मोबाईल नंबरचा वापर करू शकतात. - Gmail युजरला त्या नंबर किंवा रिकव्हरी ईमेल आयडीवर कोड पाठवेल. - हा कोड टाकल्यानंतर पासवर्ड बदलण्यासाठी विचारलं जाईल. - Sign-in केल्यानंतर आपली सिक्योरिटी चेक करुन सिक्योरिटी इन्फॉर्मेशन बदला. Gmail असं अकाउंट आहे, ज्याला आपल्या फोनची प्रत्येक गोष्ट कनेक्ट असते. अशात कोणी जीमेल लॉगइन करुन इतर अकाउंट एक्सेस तर करणार नाही ना, किंवा काही खासगी माहिती लिक होणार नाही ना ही भीती असते. त्यामुळे तुमचे अतिशय पर्सनल फोटो कधीही कोणत्याच सोशल मीडिया अकाउंटवर सेव्ह करू नका. हॅकर्स विविध मार्गांनी युजर्सपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे पर्सनल गोष्टी लीक होऊ शकतात. जाणून घ्या किती Apps आणि Websites शी लिंक आहे तुमचा Gmail पासवर्ड? असं करा डिलिंक काय आहे प्रकरण - बुलढाणा जिल्ह्यातील एका महिला पोलिसाचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. महिलेचा ई-मेल हॅक करुन फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा ग्रामीण पोलीस दलात काम करणाऱ्या एका महिला कर्मचारीसोबत हा प्रकार घडला आहे. पीडित महिलेनं आपले काही फोटो ई-मेलवरील फोल्डरमध्ये ठेवले होते. आरोपीने या महिलेचा ई-मेल हॅक केला. ई-मेल हॅक झाल्यामुळे आरोपीच्या हाती हे फोटो लागले. अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध विनयभंग तसंच आय टी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gmail, Hacking, Social media, Tech news

    पुढील बातम्या