नवी दिल्ली, 23 एप्रिल: भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. अनेक राज्यात पुन्हा लॉकडाउन करण्यात आलं आहे. अशात अनेकजण घरबसल्या ऑनलाईन शॉपिंगला प्राधान्य देत आहे. ऑनलाईन शॉपिंगसाठी फ्लिपकार्ट, अॅमेझॉनसारख्या कंपन्या अनेक आकर्षक डिल्सही ऑफर करतात, त्यामुळे अनेकांचा खरेदीसाठी ऑनलाईन वेबसाईटकडे कल वाढला आहे.
अनेक डिस्काउंट्स, ऑफर्सदरम्यान लोकांची नकली प्रोडक्ट्समुळे फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. नकली प्रोडक्ट फ्रॉडही उघड झाले आहेत. अनेक रिपोर्ट्सनुसार, मोठ्या प्रमाणात नकली प्रोडक्ट्सची विक्री केली जात आहे. अशात लोकांना सतर्क राहणं गरजेच आहे. प्रोडक्ट असली आहे की नकली हे ओळखणंही महत्त्वाचं आहे.
अॅपद्वारे होईल मदत -
फूड रेग्युलेटर FSSAI च्या Smart Consumer अॅपच्या मदतीने प्रोडक्ट असली आहे की नकली याबाबत माहिती मिळू शकते. या अॅपमध्ये प्रोडक्टचा QR नंबर टाकावा लागेल आणि त्यानंतर प्रोडक्टची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. इलेक्ट्रिक किंवा FMCG कोणतीही कंपनी नकली प्रोडक्टच्या बचावासाठी QR कोड आणि होलोग्रामचा वापर करतात. याद्वारे प्रोडक्टची ओळख केली जाऊ शकते.
मॅन्युफॅक्चरिंग आणि ब्रँडिंग -
कोणत्याही प्रोडक्टची ओळख त्याच्या लोगो आणि स्पेलिंगवरुनही केली जाऊ शकते. कोणत्याही कंपनीने दुसऱ्या प्रोडक्टनुसार लोगो आणि स्पेलिंग बनवण्याचा प्रयत्न केला तरी काहीतरी त्यात वेगळेपण असतंच. फेक प्रोडक्टचे लोगो, ओरिजिनल प्रोडक्टहून वेगळे असतात. तसंच स्पेलिंगही चुकीचं लिहिलेलं असतं. त्यामुळे कोणतीही वस्तू खरेदी करताना, त्याच्या लोगो आणि स्पेलिंगकडे लक्ष द्या.
अधिक डिस्काउंट्सवाले प्रोडक्ट -
एखाद्या प्रोडक्टवर अधिक डिस्काउंट दिला जात असल्यास, आधी त्याचा फिजिकल अॅड्रेस, ईमेल, फोन नंबर आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स चेक करा. ऑनलाईन शॉपिंग करताना अधिक डिस्काउंटच्या जाळ्यात अडकू नका. लग्जरी प्रोडक्टच्या MRP वर 70 ते 80 टक्के डिस्काउंट दिला जात नाही, असं असल्यास ते प्रोडक्ट नकली असण्याची शक्यता असते.
प्रोडक्ट वेबसाईट -
अनेक खोट्या, बनावट वेबसाईट आहेत. अनेकदा लोक Whatsapp किंवा इतर मेसेजिंग अॅपवरुन आलेल्या फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनवर मोठ्या डिस्काउंटच्या मेसेजच्या जाळ्यात अडकतात. येथे वेबसाईटची लिंकही दिलेली असते. या लिंकवरुन वेबसाईट असली किंवा नकली असल्याचं समजतं. अशावेळी URL वर लक्ष द्या. जर असली वेबसाईट असेल, तर ती साईट https ने सुरू होते. नकली वेबसाईट http पासून सुरू होते.
कस्टमर रिव्ह्यू -
प्रोडक्ट खरेदी करताना कस्टमर रिव्ह्यू वाचणं फायद्याचं ठरतं. तसंच त्या प्रोडक्टचं रेटिंगही चेक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fake, Online shopping, Tech news, Technology