सरकारचा इशारा! तुम्हालाही हा SMS आला असल्यास, लगेच करा डिलीट, बसू शकतो मोठा फटका

सरकारचा इशारा! तुम्हालाही हा SMS आला असल्यास, लगेच करा डिलीट, बसू शकतो मोठा फटका

रकारने ऑनलाईन शिक्षणासाठी (Online Education) 10 कोटी ग्राहकांना मोफत रिचार्ज प्लॅन देण्याचा निर्णय घेतला आहे, असा फेक मेसेज अनेक ग्राहकांना पाठवला जात आहे. परंतु हा मेसेज खोटा असून अशा प्रकारच्या कोणत्याही मेसेजला उत्तर न देण्याचं सांगण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 एप्रिल : जर तुम्हालाही फ्री रिचार्ज (Free Recharge) करण्यासाठी मेसेज आले असतील, तर सतर्क व्हा. हे मेसेज तुम्हाला मोठ्या अडचणीत आणू शकतात. दूरसंचार कंपन्यांच्या सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (COAI) सर्वसामान्यांना खोट्या, बनावट मेसेजेसच्या जाळ्यात न अडकण्याबाबत इशारा दिला आहे. या खोट्या, फेक मेसेजद्वारे (Fake Message) लोकांची दिशाभूल केली जात आहे. सरकारने ऑनलाईन शिक्षणासाठी (Online Education) 10 कोटी ग्राहकांना मोफत रिचार्ज प्लॅन देण्याचा निर्णय घेतला आहे, असा फेक मेसेज अनेक ग्राहकांना पाठवला जात आहे. परंतु हा मेसेज खोटा असून अशा प्रकारच्या कोणत्याही मेसेजला उत्तर न देण्याचं सांगण्यात आलं आहे.

मेसेजमध्ये आलेल्या लिंकवर क्लिक करू नका -

COAI ने याबाबत बोलताना सांगितलं की, अशा प्रकारच्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. या लिंकमुळे मोबाईल फोनमधून आवश्यक माहिती, इतर डिटेल्स चोरी होऊ शकतात. या मेसेजमध्ये, सरकार ऑनलाईन शिक्षणासाठी 10 कोटी ग्राहकांना मोफत रिचार्ज उपलब्ध करुन देत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

(वाचा - तुम्हालाही KYC Update SMS आला आहे का? टेलिकॉम कंपनीने केलं Alert)

सरकारचा असा कोणताही निर्णय नाही. तसंच हा मेसेज कुठेही फॉरवर्ड न करता, डिलीट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

रिलयान्स जिओ, भारती एयरटेल आणि वोडाफोन-आयडिया या कंपन्यांद्वारे असे फेक मेसेज येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. परंतु कंपनी असे कोणतेही मेसेज पाठवत नसून, हा मेसेजमधील फ्री रिचार्जचा दावाही खोटा असल्याचं सांगत, ग्राहकांना सतर्क करण्यात आलं आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: April 22, 2021, 6:35 PM IST

ताज्या बातम्या