मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Smartphone चोरी झाला? हे आहेत शोधण्यासाठीचे सोपे पर्याय; स्विच ऑफ फोनही होईल ट्रॅक

Smartphone चोरी झाला? हे आहेत शोधण्यासाठीचे सोपे पर्याय; स्विच ऑफ फोनही होईल ट्रॅक

मेल (Gmail) - काही मेसेजमध्ये अ‍ॅडव्हरटायजर्स ट्रॅकिंगपिक्सलचा वापर करतात. हा एक लहानसा फोटो असतो, जो लपलेला असतो. ज्यावेळी युजर मेसेज ओपन करतो, त्यावेळी हा फोटो मेल पाठवणाऱ्याला रिपोर्ट करतो. iOS 15 मध्ये मेल ट्रॅकर ब्लॉक करण्यासाठी टूल आहे, जो सेटिंगमध्ये मेल सेक्शनमध्ये इनेबल करता येतो.

मेल (Gmail) - काही मेसेजमध्ये अ‍ॅडव्हरटायजर्स ट्रॅकिंगपिक्सलचा वापर करतात. हा एक लहानसा फोटो असतो, जो लपलेला असतो. ज्यावेळी युजर मेसेज ओपन करतो, त्यावेळी हा फोटो मेल पाठवणाऱ्याला रिपोर्ट करतो. iOS 15 मध्ये मेल ट्रॅकर ब्लॉक करण्यासाठी टूल आहे, जो सेटिंगमध्ये मेल सेक्शनमध्ये इनेबल करता येतो.

Smartphone हरवल्यानंतर किंवा चोरी झाल्यानंतर काही गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे.

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : स्मार्टफोन (Smartphone) हरवल्यानंतर किंवा चोरी झाल्यानंतर काही गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. सर्व अँड्रॉइड (Android) फोनमध्ये असे टूल असतात ज्याच्या मदतीने तुम्ही सुरक्षित होऊ शकता. त्याशिवाय स्मार्टफोन सहजपणे ट्रॅकही करता येतो.

सर्वात आधी काय कराल?

सर्वात आधी तुमच्या फोन नंबरवर कॉल करा. चुकून फोन कुठे राहिला असेल तर दुसऱ्या फोनवरुन कॉल करुन तो शोधता येतो. पण फोन स्विच ऑफ येत असेल, तर अशा वेळी फोन लॉक करणं गरजेचं आहे.

iPhone युजर्सनी सर्वात आधी दुसऱ्या डिव्हाइसमध्ये लॉगइन करुन फोनवर Lost Mode अॅक्टिवेट करा. त्यानंतर Find My iPhone पर्यायाचा वापर करा. जर तुम्ही Android युजर असाल, तर Android Device Manager चा वापर करू शकता. याच्या मदतीने Find My Device चा वापर करू शकता. तसंच फोनचा डेटाही डिलीट करू शकता.

हे वाचा - मुंबईतील तरुणीसोबत घडला विचित्र प्रकार;WhatsApp वापरत असाल तर आधी हा VIDEO पाहाच

iPhone युजर्स काय कराल?

- सर्वात आधी iPhone मध्ये Setting मध्ये Find My वर जावं लागेल. इथे Apple ID द्वारे साइन-इन करावं लागेल.

- Sign-in केल्यानंतर Find My iPhone वर टॅप करावं लागेल आणि ते इनेबल करावं लागेल.

- Find My Network च्या मदतीने तुम्ही फोनमध्ये नेटवर्क नसतानाही फोन शोधू शकता. Find My Network ऑन केल्यानंतर फोन ऑफ असेल, तरीही 24 तासांपर्यंत फोनचं लोकेशन ट्रॅक होतं. जर तुमच्याकडे दुसरा iPhone नसेल, तर तुम्ही iCloud.com च्या मदतीने फोन शोधू शकता.

हे वाचा - Google वर दिवस-रात्र काय Search करतात तरुणी? ही लिस्ट एकदा पाहाच

Android युजर्स -

Google युजर्सला सर्वात आधी android.com/find वर जावं लागेल. त्यानंतर गुगल अकाउंट साइन-इन करावं लागेल. त्यानंतर युजर्सला Lost Phone आयकॉनवर क्लिक करावं लागेल. हा पर्याय स्क्रिनच्या टॉपला मिळेल.

तुमच्या फोनवर एक नोटिफिकेशन येईल. यात तुम्ही तुमच्या स्क्रिनवर फोनचं लोकेशन पाहू शकता.

युजर्स फोनमधून iCloud आणि Google Account चा डेटा डिलीट करू शकतात. परंतु असं केल्यानंतर तुम्ही फोन पुन्हा ट्रॅक करू शकत नाही.

First published:

Tags: Android, Iphone, Smartphone