नवी दिल्ली, 26 जुलै: आपल्या देशात ज्या संख्येत नवे फोन खरेदी केले जातात, तितकीच विक्री सेकंड हँड स्मार्टफोन्सचीही होते. OLX आणि Quiker सारख्या वेबसाईट्सद्वारे जुना फोन विकणं अधिकच सोपं होतं. परंतु सेकंड हँड फोन
(Second Hand Phone) खरेदी करणं काही वेळा धोक्याचं, नुकसानीचंही ठरू शकतं. अशी अनेक प्रकरणं समोर आलं आहेत, ज्यात ग्राहकांचे चोरी केलेले फोन विकण्यात आले. या बाबी लक्षात घेता पोलिसांनी या घटनांपासून वाचण्यासाठी काही गोष्टी जारी केल्या आहेत.
दिल्ली पोलिसांनी सेकंड हँड फोन खरेदी करणाऱ्यांना ट्विट करत काही सूचना केल्या आहेत. ज्यावेळी कधीही सेकंड हँड फोन खरेदी कराल, त्यावेळी IMEI नंबर वेरिफाय करणं आवश्यक आहे. IMEI नंबर चेक करण्यासाठी पोलिसांनी Zipnet वेबसाईटचा वापर करण्याचंही सांगितलं आहे. असा फोन खरेदी करताना सावध राहणं गरजेचं आहे. सेकंड हँड फोन चोरी किंवा एखाद्या गुन्ह्यात वापरलेला अशू शकतो. अशा सेकंड हँड फोनचे IMEI दिल्ली पोलिसांकडून Zipnet सिस्टमवर लिस्टेट केले जातात.
असा तपासा IMEI नंबर -
IMEI अर्थात इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी हा एक 15 अंकी नंबर असतो. हा नंबर प्रत्येक मोबाईलसाठी वेगळा असतो. हा फोनसाठी फिंगरप्रिंट प्रमाणे काम करतो. स्मार्टफोन चोरी झाल्यास नेटवर्कवर फोनची ओळख करण्यासाठी याचा वापर केला जातो. IMEI नंबरशिवाय मोबाइल फोन विकणं भारतात बेकायदेशिर आहे.
- ज्यावेळी कोणताही सेकंड हँड फोन खरेदी करता, त्यावेळी फोनमध्ये *#06# टाईप करा. या नंबर टाकल्यानंतर फोनचा IMEI नंबर येईल. आता https://zipnet.delhipolice.gov.in/ वेबसाईटवर जा. इथे Missing Mobile पर्यायावर क्लिक करा. सर्चमध्ये IMEI नंबर टाकून सर्च केल्यानंतर चोरी किंवा एखाद्या गुन्ह्यात वापरल्या गेलेल्या फोनचा डेटाबेसमध्ये नंबर दिसेल.
तसंच, तुम्ही घेत असलेला स्मार्टफोन चोरीचा आहे का, तसंच तुम्ही घेणार असलेला फोन खरा आहे का, या गोष्टी नागरिकांना पडताळून पाहता येण्यासाठी सरकारने एक सुविधा आता उपलब्ध केली आहे. सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) हा नवा प्लॅटफॉर्म सरकारने सादर केला आहे. त्यावर फोनचा IMEI नंबर तपासता येतो. फोन विकत घ्यावा की नाही, याचा निर्णय त्याआधारे करणं शक्य होतं.
IMEI नंबर मिळाल्यानंतर सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टरच्या https://ceir.gov.in/Home/index.jsp या वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर डिव्हाइस व्हेरिफिकेशन पेजला https://ceir.gov.in/Device/CeirIMEIVerification.jsp या लिंकवर भेट द्या. IMEI नंबर वैध आहे की नाही, हे त्याद्वारे कळेल. अवैध IMEI नंबर असलेल्या किंवा ब्लॉक केलेला IMEI नंबर असलेला फोन विकत घेऊ नका. असे फोन चोरीचे असल्याची शक्यता जास्त असते. हे टूल वापरण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर द्यावा लागतो आणि ओटीपीद्वारे नंबर व्हेरिफाय करावा लागतो.
या पेजवर तुम्हाला संबंधित IMEI नंबरचं स्टेटस ब्लॅकलिस्टेड, डुप्लिकेट किंवा ऑलरेडी इन यूझ असं दिसत असेल, तर तो फोन विकत घ्यायचं टाळा, असं सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टरची वेबसाइट सांगते. IMEI is valid असं स्टेटस असलेला फोनच विकत घ्यावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.