मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Cyber Fraud Alert! या 4 चुका अजिबात करू नका, बँकेने दिली Online Banking बाबत महत्त्वपूर्ण माहिती

Cyber Fraud Alert! या 4 चुका अजिबात करू नका, बँकेने दिली Online Banking बाबत महत्त्वपूर्ण माहिती

ऑनलाईन फ्रॉडपासून वाचण्यासाठी सरकारसह अनेक बँकांकडूनही ग्राहकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. स्टेट बँक ऑफ इंडियाकडूनही ग्राहकांना अलर्ट करण्यात आलं आहे.

ऑनलाईन फ्रॉडपासून वाचण्यासाठी सरकारसह अनेक बँकांकडूनही ग्राहकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. स्टेट बँक ऑफ इंडियाकडूनही ग्राहकांना अलर्ट करण्यात आलं आहे.

ऑनलाईन फ्रॉडपासून वाचण्यासाठी सरकारसह अनेक बँकांकडूनही ग्राहकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. स्टेट बँक ऑफ इंडियाकडूनही ग्राहकांना अलर्ट करण्यात आलं आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 25 जुलै: देशात कोरोना काळात सायबर फ्रॉडच्या (Cyber Fraud) संख्येत मोठी वाढ झाली आहे. एकीकडे ऑनलाईन व्यवहार वाढले असताना, दुसरीकडे ऑनलाईन फसवणुकीच्या (Online Fraud) प्रकरणातही वाढ झाली आहे. ऑनलाईन फ्रॉडपासून वाचण्यासाठी सरकारसह अनेक बँकांकडूनही ग्राहकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. स्टेट बँक ऑफ इंडियाकडूनही ग्राहकांना अलर्ट करण्यात आलं आहे. SBI ने ट्विट करुन लोकांना काही गोष्टींकडे लक्ष देण्याचं सांगितलं असून तक्रार दाखल करण्याबाबतही माहिती दिली आहे.

अनेक जण काही तक्रारी बँकेच्या सोशल मीडियावर दाखल करतात आणि यावेळी तक्रार करताना खासगी डिटेल्सही शेअर करतात. परंतु तक्रार दाखल करताना कधीही आपले खासगी डिटेल्स शेअर न करण्याचं बँकेकडून सांगण्यात आलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने बँकिंग डिटेल्स शेअर न करण्याचं सांगितलं असून अशाप्रकारे झालेल्या नुकसानासाठी बँक जबाबदार नसल्याचंही सांगितलं आहे. अशा डिटेल्ससह केलेल्या तक्रारींच्या पोस्ट त्वरित हटवण्याचं बँकेने म्हटलं आहे. बँकेने DM द्वारे संपर्क करण्याचं ग्राहकांना सांगितलं आहे.

एखाद्या बँक कर्मचाऱ्याचा व्यवहार योग्य नसल्यास ग्राहक त्या कर्मचाऱ्याबाबतही तक्रार करू शकतात. https://crcf.sbi.co.in/ccf/ वर Existing Customer MSME/ Agri/ Other Grievance under >> General Banking >> Branch Related या अंतर्गत तक्रार दाखल करण्याचं बँकेने म्हटलं आहे.

जगात इतकी लोकसंख्याही नाही, जितक्या वेळा Google चं हे App डाउनलोड करण्यात आलं

सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये वाढ होत असताना ग्राहकांनी कोणत्याही ईमेल, कॉल, लिंक, ओटीपी, पासवर्ड, युजर आयडी, डेबिट कार्ड नंबर, सीवीवी, KYC असे कोणतेही डिटेल्स कोणाशीही शेअर न करण्याचं सांगितलं आहे. अशाप्रकारे कोणताही फ्रॉड झाल्यास report.phishing@sbi.co.in तक्रार दाखल करावी.

Vehicle Insurance: अपघात झाल्यास नुकसान भरपाईबाबत कोर्टाचा मोठा निर्णय

तसंच एखाद्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करताना, चुकीच्याच खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास यासाठी बँक जबाबदार नसते. त्यामुळे डिजीटल ट्रान्सफर करताना खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी अकाउंट डिटेल्स वेरिफाय करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दुसऱ्याच्याच खात्यात पैसे ट्रान्सफर झाले, तर ग्राहकांनी आपल्या होम ब्राँचमध्ये किंवा त्या दुसऱ्या व्यक्तीच्या बँकेशी संपर्क करावा.

First published:

Tags: Cyber crime, Online fraud, Sbi alert, Tech news