मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमचं बँक अकाउंट Aadhaar नंबरने हॅक होऊ शकतं का? UIDAI ने दिलं उत्तर

तुमचं बँक अकाउंट Aadhaar नंबरने हॅक होऊ शकतं का? UIDAI ने दिलं उत्तर

आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक करणंही अनिवार्य आहे. त्यामुळे बँक खातं आधार क्रमांकाद्वारे हॅक केलं जाऊ शकतं का असा प्रश्नही उपस्थित होत आहे. याबाबत UIDAI ने उत्तर दिलं आहे.

नवी दिल्ली, 25 जुलै : प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) महत्त्वाचं कागदपत्र आहे. बँका, रेशन कार्ड, शाळा, कॉलेज, ड्रायव्हिंग लायसन्स अशा कितीतरी कामांसाठी आधार कार्डची गरज असते. आधार कार्ड होल्डर्सला एक यूनिक 12 अंकी आधार क्रमांक मिळतो, जो UIDAI कडून जारी केला जातो. यात व्यक्तीची खासगी महिती असल्याने हा नंबर महत्त्वाचा ठरतो. याबाबत सतर्कता बाळगणंही आवश्यक ठरतं. आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक (Aadhaar link to Bank Account) करणंही अनिवार्य आहे. त्यामुळे बँक खातं आधार क्रमांकाद्वारे हॅक (Bank Account Hack) केलं जाऊ शकतं का असा प्रश्नही उपस्थित होत आहे. याबाबत UIDAI ने उत्तर दिलं आहे.

आधारद्वारे बँक अकाउंट हॅक केलं जाऊ शकत नसल्याचं UIDAI ने सांगितलं आहे. ज्याप्रमाणे केवळ ATM कार्ड नंबर माहित असल्याने कोणी एटीएम मशीनद्वारे पैसे काढू शकत नाही, त्याप्रमाणेच केवळ आधार क्रमांक माहित असल्याने कोणीही बँक अकाउंट हॅक करू शकत नाही. तसंच अकाउंटमधून पैसेदेखील काढू शकत नाही.

Fraud Alert! या 4 चुका अजिबात करू नका, Online Banking बाबत महत्त्वपूर्ण माहिती

सर्व फ्रॉडपासून वाचण्यासाठी ग्राहकांनी बँकेने दिलेला PIN नंबर किंवा OTP क्रमांक इतरांशी शेअर करू नये. हे डिटेल्स कोणाशीही शेअर न केल्याचं तुमचं अकाउंट सुरक्षित आहे. केवळ आधार क्रमांकांचा वापर बँकिंग किंवा इतर कोणत्याही सेवेचा केला जाऊ शकत नाही.

UIDAI ने सांगितला Aadhaar सुरक्षित ठेवण्याचा नवा पर्याय; असा लॉक करा तुमचा Aadhar card number

तसंच, फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी UIDAI ने युजर्ससाठी आधार कार्ड लॉक-अनलॉक करण्याची ऑनलाईन सुविधा दिली आहे. यामुळे आधार कार्डचा दुरुपयोग होणार नाही.

First published:

Tags: Aadhar card, M aadhar card