नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी : अनेकांकडून दररोजच्या जीवनात गुगल मॅपचा (Google Maps) मोठा वापर केला जातो. त्याचा फायदाही होतो. आतापर्यंत तुम्ही गुगल मॅपचा वापर केवळ लोकेशनवर (Google Maps Location) पोहोचण्यासाठी केला असेल. पण आता केवळ लोकेशनसाठीच नाही, तर पैसे कमावण्यासाठीही (Earning) याचा चांगला वापर करता येईल. अनेकांना याबाबत माहिती नाही. परंतु गुगल मॅपच्या मदतीने कमाई करणं शक्य आहे. Google Maps आता युजर्सला केवळ योग्य ठिकाणी पोहोचवण्याचं काम करत नाही, तर याद्वारे कमाईचीही संधी देत आहे. काही सोप्या गोष्टी समजून घेतल्यास Google Map च्या मदतीने तुम्ही पैसे कमावू शकता. अशी होऊ शकते कमाई - जर तुम्ही Google Maps चा वापर करत असाल, तर तुम्हाला सर्वात आधी गुगलवर (Google) लिस्ट असलेले असे व्यवसाय-बिजनेस शोधावे लागतील, जे वेरिफाइड नाहीत. अशा व्यवसायाच्या मालकांना अर्थात ओनर्सला एक ईमेल पाठवावा लागेल. या मेलमध्ये तुम्हाला व्यवसाय मालकांना तुम्ही त्यांची कशी मदत करताय हे सांगावं लागेल. तुम्ही त्यांचा व्यवसाय गुगल मॅपवर लिस्ट करण्यासाठी कशी मदत कराल हे सांगावं लागेल.
हे वाचा - चार अंकीच का असतो ATM PIN? हे आहे त्यामागचं कारण; जाणून घ्या
गुगलच्या पॉलिसीनुसार, जर एखादा व्यवसाय गुगल मॅपवर वेरिफाइड (Business Verified on Google Maps) नसेल, तर तो लिस्टमधून हटवला जाईल. अनेकदा अनेक बिजनेस गुगल मॅपवर लिस्टेट असतात. पण ते वेरिफाइड नसतात. असे वेरिफाइड नसलेले बिजनेस गुगलकडून हटवले जातात.
हे वाचा - वस्तू खरेदीसाठी इंटरनेटवर सर्च केल्यावर ऑनलाइन सगळीकडे त्यासंबंधी Ads का दिसतात?
50 डॉलरपर्यंत होऊ शकते कमाई - गुगल पॉलिसी अंतर्गत व्यवसाय मालकाचा बिजनेस लिस्ट करण्यासाठी तुम्हाला त्याची मदत करावी लागेल. आणि त्याबदल्यात तो तुम्हाला काही रक्कम देईल. ही पद्धत चांगली ठरत असून अनेक तरुण याद्वारे चांगली कमाईही करत आहेत. अनेक तरुणांकडून Google Maps द्वारे 20 डॉलर ते 50 डॉलरपर्यंत कमाई केली जात आहे.