Home /News /technology /

वस्तू खरेदीसाठी इंटरनेटवर सर्च केल्यावर ऑनलाइन सगळीकडेच त्यासंबंधी Ads का दिसतात? यामागे आहे हे कारण

वस्तू खरेदीसाठी इंटरनेटवर सर्च केल्यावर ऑनलाइन सगळीकडेच त्यासंबंधी Ads का दिसतात? यामागे आहे हे कारण

अनेकदा एखादी गोष्ट खरेदी करण्यासाठी जेव्हा तुम्ही एखाद्या ई-कॉमर्स साइटवर सर्चिंग सुरू करता, त्या क्षणापासून त्या गोष्टीशी निगडित जाहिराती तुम्ही इंटरनेट सुरू करताच चालू होतात.

मुंबई, 20 फेब्रुवारी: गेल्या काही वर्षांत बहुतांश गोष्टी ऑनलाइन झाल्या आहेत. आता ऑनलाइन माध्यमातून बॅंकिंग, शासकीय कामं, शॉपिंग (Shopping) अर्थात खरेदी आदी गोष्टी करता येतात. सध्या ऑनलाइन शॉपिंगसाठी अनेक ई-कॉमर्स साइट्स (E-Commerce Sites) उपलब्ध आहेत. या साइट्सवर इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, फर्निचर, औषधं, कॉस्मेटिक्स, मोबाइल, कॅमेरे, ग्रोसरीज, कपडे आदी दैनंदिन गरजेच्या वस्तू अगदी एका क्लिकवर उपलब्ध आहेत. या खरेदीवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स किंवा डिस्काउंट मिळत असल्याने साहजिकच याकडे ग्राहकांचा कल वाढल्याचं दिसून येतं. अनेकदा एखादी गोष्ट खरेदी करण्यासाठी जेव्हा तुम्ही एखाद्या ई-कॉमर्स साइटवर सर्चिंग सुरू करता, त्या क्षणापासून त्या गोष्टीशी निगडित जाहिराती तुम्ही इंटरनेट सुरू करताच चालू होतात. या जाहिराती तुम्ही वापरत असलेल्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर दिसू लागतात. एकूणच काय तर एखाद्या गोष्टीचं एकदा सर्चिंग केलं तर त्याच्या जाहिराती तुमची पाठ सोडत नाहीत. हे असं का होतं, याचा विचार तुमच्या मनात कधी ना कधी आलाच असेल. यामागे काही खास तांत्रिक कारणं आहेत. हे वाचा-VIDEO: पाण्यात बुडवलं, त्यावरून कारही चालवली; 'या' स्मार्टफोनला काहीच झालं नाही समजा तुम्ही रोजच्या वापरातली एखादी वस्तू खरेदी करण्याच्या उद्देशानं एखाद्या ई-कॉमर्स वेबसाइटवर सर्चिंग करत असाल, तर त्या वस्तूच्या अनुषंगाने दुसऱ्या एखाद्या ई-कॉमर्स वेबसाइटवरच्या उत्पादनांच्या जाहिराती तुम्हाला स्क्रीनवर दिसू लागतात. तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही अशा प्रकारच्या जाहिराती दिसू लागतात. यामागे काही कारणं आहेत. इंटरनेट कुकीज (Internet Cookies) हे त्यापैकी एक महत्त्वाचं कारण होय. सर्व वेबसाइट्स या एकमेकांशी जोडलेल्या असतात आणि त्या तुमच्या इंटरनेट कुकीज एकमेकांशी शेअर करतात. यामुळे तुमच्या आवडत्या उत्पादनाची माहिती अन्य वेबसाइट्सनाही मिळते. ग्राहकांचं संभाषण रेकॉर्ड करून त्याचा डाटा तयार करून अन्य कंपन्यांना दिला जात असल्याचा आरोपही अनेक वेळा करण्यात आला; मात्र संबंधित कंपन्यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. हे वाचा-Online PF Transfer साठी आहे सोपी प्रोसेस, पाहा कसं कराल अप्लाय ज्या वेळी तुम्ही एखाद्या वेबसाइटवर जाऊन काही Activity करता, तेव्हा वेबसाइट तुमच्या ब्राउजरवर (Browser) कुकीज सेव्ह करतात. कुकीज हा एक छोटासा प्रोग्राम असतो. त्याच्या मदतीने वेबसाइट आपल्या खास युझरला लक्षात ठेवू शकते. हे काम प्रत्येक वेबसाइट करते आणि तुमचा मूड जाणून घेते. एखाद्या वेबसाइटवर गेल्यानंतर कुकीज वारंवार तुम्हाला परमिशन मागून त्रस्त करून सोडतात आणि अखेरीस तु्म्ही परमिशन देऊन टाकता. या कुकीजच्या माध्यमातून तुमची सर्व ऑनलाइन हिस्ट्री (Online History) सेव्ह होते आणि त्यानंतर कंपन्या जाहिरातींसाठी तुम्हाला सहजपणे ट्रॅक करू लागतात. एखाद्या वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्ही नेमकं काय पाहता, कुठे क्लिक करता, एका पेजवर किती वेळ राहता, कोणत्या खास लिंक्सवर क्लिक करता, या सर्व गोष्टींचा डाटा तयार होतो. या डाटाच्या आधारे तुम्हाला कंटेंट दिला जातो. हे वाचा-दुसऱ्यांनी बनवलेल्या व्हिडीओद्वारे YouTubeवर लाखो कमावतात लोक,पाहा काय आहे ट्रिक तुमच्या सर्व अॅक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवलं जातं आणि त्यामुळे जाहिरातींच्या स्पेसमध्ये तुमच्या अॅक्टिव्हिटीनुसार जाहिराती दिसू लागतात. तसंच यापूर्वी सर्च केलेल्या कंटेंटच्या आधारे तुम्हाला सर्चिंग ऑप्शन उपलब्ध करून दिले जातात. एखादा व्हिडिओ तुम्ही वारंवार पाहिला असेल, तर त्याच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया साइट्सवर दिसू लागतात. एकूणच अशा पद्धतीने तुमच्या सर्व गरजांची माहिती त्यांना मिळते आणि इंटरनेटवरच्या जाहिराती तुम्हाला टारगेट करू लागतात.
First published:

Tags: Online, Online shopping

पुढील बातम्या