जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / ATM PIN चार अंकी असण्यामागे हे आहे मुख्य कारण, जाणून घ्या

ATM PIN चार अंकी असण्यामागे हे आहे मुख्य कारण, जाणून घ्या

ATM PIN चार अंकी असण्यामागे हे आहे मुख्य कारण, जाणून घ्या

एटीएममधून पैसे काढताना एक चार अंकी पिन (Why ATM has 4 digit long pin) टाकावा लागतो. आज आम्ही तुम्हाला याच एटीएमच्या पिनशी संबंधित महत्त्वाची माहिती ( interesting information ) देणार आहोत.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी:  माणसाचं जीवन ( life ) सुसह्य करण्याचं काम विज्ञानाने ( Science ) केलं आहे. विज्ञानाने लावलेल्या एकापेक्षा एक शोधामुळे आपले जीवन पूर्वीपेक्षा सोयीस्कर झालं आहे. असाच एक शोध म्हणजे एटीएमचा ( ATM ). एटीएममुळे पैसे ( money ) काढण्यासाठी बँकेतील ( bank ) लांबचलांब रांगामध्ये थांबणं, पैशांसाठी वाट पाहण्याचा त्रास संपला. यामुळे बँकेत जाऊन पैसे काढण्यासाठी लागणारा आपला वेळही वाचला आहे. एटीएममधून पैसे काढताना एक चार अंकी पिन (Why ATM has 4 digit long pin) टाकावा लागतो. आज आम्ही तुम्हाला याच एटीएमच्या पिनशी संबंधित महत्त्वाची माहिती ( interesting information ) देणार आहोत. बँकिंगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी शोध म्हणजे एटीएम मशीन. हे मशीन जॉन एड्रियन शेफर्ड-बॅरॉन (John Shepherd-Barron) या स्कॉटिश शास्त्रज्ञाने शोधलं होतं. विशेष म्हणजे या शास्त्रज्ञाचा जन्म भारतातच शिलाँग शहरात झाला होता. त्यांनीच 1969 साली एटीएम शोधून काढलं, व ते जगभर लोकप्रिय झालं. एटीएमचा पिन म्हणून असतो 4 अंकी शेफर्ड यांनी एटीएम मशीन तयार करून त्यात कोडिंग सिस्टिम बसवली, तेव्हा पिन क्रमांक फक्त चार अंकी का ठेवला? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण काळजी करू नका, आम्ही तुम्हाला आज त्याबाबत माहिती देणार आहोत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सुरुवातीला एटीएम पिन 4 अंकांचा असावा, असा शेफर्ड यांचा कोणताही प्लान नव्हता, उलट त्यांना तो 6 अंकी ठेवायचा होता. पण जेव्हा त्यांनी त्यांची पत्नी कॅरोलिनवर हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पुन्हा पुन्हा ती 6 अंकांपैकी 2 अंक विसरायची. तिला फक्त 4 अंक आठवत होते. त्याच वेळी, शेफर्ड यांनी अंदाज लावला की, मानवी मेंदू सहजपणे 6 ऐवजी 4 अंक लक्षात ठेवू शकतो, व त्यांनी एटीएम पिन चार अंकी ठेवला. काही देशांमध्ये वापरला जातो 6 अंकी पिन शेफर्ड यांनी जरी एटीएमचा पिन 4 अंकी ठेवला असला तरी तो 6 अंकी ठेवण्यामागचा त्यांचा उद्देश होता तो अधिक सुरक्षित करणे. 4 अंकी एटीएम पिन 0000 ते 9999 या दरम्यानचा असतो. याचाच अर्थ कोणत्याही एटीएमचा पिन हा 10000 भिन्न पिन नंबरपैकी एकच ठेवता येतो, ज्यामध्ये 20 टक्के पिन हॅक केले जाऊ शकतात. अर्थात 4 अंकी पिन सहज हॅक केला जाऊ शकत नसला, तरी तो 6 अंकी पिन पेक्षा कमी सुरक्षित आहे. तसेच, काही देशांमध्ये आजही 6 अंकी एटीएम पिन वापरला जातो. एटीएम मशीनचा वापर आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता तर बँकेत खातं उघडल्यानंतर खातेदाराला एटीएम कार्ड हे दिलंच जातं. तसंच त्याचा वापर करण्याचा सल्लाही दिला जातो. अर्थात एटीएममुळे बँकेत जाऊन पैसे काढण्याचा वेळही वाचला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ATM
  • First Published :
जाहिरात
जाहिरात