Home /News /technology /

PAN Card Correction: घरबसल्या दुरुस्त करा पॅन कार्डमधील चूका, पाहा सोपी पद्धत

PAN Card Correction: घरबसल्या दुरुस्त करा पॅन कार्डमधील चूका, पाहा सोपी पद्धत

पॅन कार्डमध्ये काही चूक असल्यास ती सुधारण्यासाठी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या पॅन कार्डमधील चूका दुरुस्त करू शकता.

  नवी दिल्ली, 16 मार्च : परमनेंट अकाउंट नंबर अर्थात पॅन कार्ड महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. भारतीय इन्कम टॅक्स विभागाकडून पॅन कार्ड (PAN Card) जारी केलं जातं. पॅन कार्डमध्ये 10 अंकी यूनिक अल्फान्यूमेरिक नंबर असतात. पॅन कार्डचा वापर न केवळ टॅक्ससंबंधित कामांसाठी होतो, तर एक ओळख पत्र म्हणूनही याचा वापर केला जातो. अनेकदा पॅन कार्डमध्ये चुका होतात त्या सुधारवल्या नाहीत, तर समस्या उद्भवू शकतात. पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक करणं अनिवार्य आहे. पॅन कार्डमध्ये त्रुटी असल्यास ते आधारशी लिंक होऊ शकत नाही. कारण पॅन आणि आधारची नाव आणि जन्मतारीख एकसमान असावी लागते. Aadhaar Card आणि PAN Card लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. पॅन कार्डमध्ये काही चूक असल्यास ती सुधारण्यासाठी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या पॅन कार्डमधील चूका दुरुस्त करू शकता.

  हे वाचा - अप्लाय करुनही आलं नाही PAN Card, असं चेक करा स्टेटस

  असे करा बदल - पॅन कार्डवरील जन्मतारीख किंवा नावात चूक झाली असल्यास ती सुधारण्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या टॅक्स इनफॉर्मेशन नेटवर्क https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html वर जावं लागेल. इथे अॅप्लिकेशन टाइपवर जा आणि Changes or Correction in existing PAN Data/Reprint of PAN Card पर्यायावर क्लिक करा. मागितलेले सर्व डिटेल्स भरा, कॅप्चा कोड टाकून सबमिट करा. त्यानंतर आधार, पासपोर्ट किंवा इतर काही डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. त्यानंतर पेमेंट करावं लागेल. पेमेंट केल्यानंतर बँक रेफरेन्स नंबर आणि ट्रान्झेक्शन नंबर येईल. तो सेव्ह करा आणि Continue वर क्लिक करा. त्यानंतर एक फॉर्म भरावा लागेल. यात पॅन कार्डवरील चुकीच्या माहितीबाबत सांगावं लागेल, ज्यात सुधारणा करायची आहे. ही माहिती भरुन सबमिट करा. काही दिवसांत सुधारणा केलेलं पॅन कार्ड मिळेल.

  हे वाचा - SMS द्वारे लगेच लिंक करा Aadhaar-PAN Card, नाहीतर बसेल 10000 रुपयांचा फटका

  पॅन कार्ड संबंधी कोणत्याही माहितीसाठी तुम्ही एनएसडीएलच्या हेल्पलाइन नंबर 1800-180-1961 आणि 020-27218080 वर संपर्क करू शकता. त्याशिवाय इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ईमेल आयडी efilingwebmanager@incometax.gov.in आणि tininfo@nsdl.co.in वर तक्रार करू शकता.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: PAN, Pan card, Pan card online, Tech news

  पुढील बातम्या