नवी दिल्ली, 14 मार्च : परमनेंट अकाउंट नंबर
(Permanent Account Number) अर्थात पॅन कार्ड
(PAN) अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. पॅन नंबर 10 अंकी अल्फान्यूमेरिक नंबर असतो. इन्कम टॅक्स रिटर्न ते बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी, इन्शोरन्ससाठी किंवा सराकारी योजनेचा फायदा घेण्यासाठीही पॅन कार्डची गरज असते. प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड आवश्यक असतं. पॅन कार्ड मोबाइल नंबर आणि आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे. 31 मार्चपर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक करणं महत्त्वाचं आहे.
पॅन कार्ड अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट असून हे तुमच्याकडे नसेल तर लगेच बनवणं गरजेचं आहे. अनेकदा लोकांची तक्रार असते, की त्यांनी पॅन कार्डसाठी अप्लाय केलं आहे, परंतु अनेक दिवस होऊनही ते पॅन कार्ड मिळालेलं नाही.
अनेकदा पॅन कार्ड हरवल्यानंतर ते डुप्लिकेट काढण्यासाठी अप्लाय केल्यानंतरही कित्येक दिवस आलं नसल्याची अनेकांची तक्रार असते. अशात तुम्ही पॅन कार्डचं स्टेटट चेक करू शकता.
असं चेक करा पॅन कार्ड स्टेटस -
पॅन कार्ड स्टेटस चेक करण्यासाठी सर्वात आधी इन्कम टॅक्स वेबसाइट www.incometaxindia.gov.in/pages/pan.aspx वर जावं लागेल. इथे Instant PAN through Aadhaar या पर्यायावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर Check Status of PAN वर क्लिक केल्यानंतर आधार नंबर मागितला जाईल. आधार नंबर टाकल्यानंतर मोबाइल नंबरवर OTP येईल. ओटीपी टाकल्यानंतर काही स्क्रिनवर पॅन कार्ड स्टेटट दिसेल.
31 मार्चआधी करा हे काम -
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नियमांनुसार, 31 मार्च 2022 आधी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणं अनिवार्य आहे. असं न केल्यास पॅन कार्ड डिअॅक्टिव्हेट होईल. तसंच 10000 रुपये दंडही भरावा लागू शकतो.
- इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ई-फायलिंग पोर्टल www.incometaxindiaefiling.gov.in वर जा.
- त्यानंतर युजर ID, पासवर्ड आणि जन्मतारीख टाइप करुन पोर्टलमध्ये लॉगइन करा. पोर्टलवर रजिस्टर्ड नसाल, तर पॅन कार्डचा वापर करू शकता.
- मेन्यू बारमध्ये Profile Settings वर क्लिक करा आणि Link Aadhaar पर्यायावर क्लिक करा.
- डिटेल्स चेक करा आणि आधार नंबर टाकून Link Aadhaar बटणावर क्लिक करा. यानंतर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.