जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / SMS द्वारे लगेच लिंक करा Aadhaar-PAN Card, नाहीतर बसेल 10000 रुपयांचा फटका

SMS द्वारे लगेच लिंक करा Aadhaar-PAN Card, नाहीतर बसेल 10000 रुपयांचा फटका

SMS द्वारे लगेच लिंक करा Aadhaar-PAN Card, नाहीतर बसेल 10000 रुपयांचा फटका

नवी दिल्ली, 13 मार्च : तुम्ही अजूनही आधार कार्ड पॅन कार्डला लिंक (Aadhaar - PAN Card Link) केलं नसेल, तर लगेच लिंक करा. आधार - पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख अगदी जवळ आली आहे. 31 मार्चपर्यंत आधार कार्डशी पॅन लिंक करता येणार आहे. आधार - पॅन लिंक केल्यामुळे आयकर विभागाला कोणत्याही प्रकारची करचोरी शोधून काढता येते. सरकारची फसवणूक करण्यासाठी अनेक जण एकाहून अधिक पॅन कार्ड काढतात. लिंक केल्यामुळे एकाहून अधिक पॅन कार्ड काढण्याचं प्रमाणंही रोखण्यास मदत होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

हे वाचा -  Aadhaar Update : रजिस्टर्ड मोबाइल नंबरशिवाय डाउनलोड करा आधार कार्ड, पाहा प्रोसेस

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केल्याशिवाय तुम्ही रिटर्न फाइल करू शकता. परंतु जोपर्यंत तुम्ही आधार - पॅन लिंक करत नाही, तोपर्यंत इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमचं रिटर्न प्रोसेस करणार नाही. 31 मार्च 2022 पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक न केल्यास 10000 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. तसंच पॅन कार्ड निष्क्रिय अर्थात डिअॅक्टिव्हेटही होऊ शकतं.

हे वाचा -  Aadhaar Card हरवलं? टेन्शन नको,आता आधार, एनरोलमेंट नंबर नसतानाही असं करा डाउनलोड

SMS द्वारे लिंक करा Aadhaar - PAN Card - - सर्वात आधी स्मार्टफोनमध्ये मेसेज ओपन करा. - नवा मेसेज टाइप करा. - टेक्स्ट मेसेज सेक्शनमध्ये UIDPAN <12 अंकी आधार नंबर > <10 अंकी पॅन नंबर> टाइप करुन 567678 किंवा 56161 या क्रमांकावर SMS पाठवा.

हे वाचा -  बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर लगाम, चुकीच्या बाजूने Driving केल्यास होणार गुन्हा

वेबसाइटद्वारे असं करा Aadhaar-PAN लिंक - - इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ई-फायलिंग पोर्टल www.incometaxindiaefiling.gov.in वर जा. - त्यानंतर युजर ID, पासवर्ड आणि जन्मतारीख टाइप करुन पोर्टलमध्ये लॉगइन करा. पोर्टलवर रजिस्टर्ड नसाल, तर पॅन कार्डचा वापर करू शकता. - मेन्यू बारमध्ये Profile Settings वर क्लिक करा आणि Link Aadhaar पर्यायावर क्लिक करा. - डिटेल्स चेक करा आणि आधार नंबर टाकून Link Aadhaar बटणावर क्लिक करा. यानंतर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात