नवी दिल्ली, 28 मार्च : Google चं मेल App जीमेल (Gmail) अतिशय पॉप्युलर प्लॅटफॉर्म आहे. अनेकजण याच प्लॅटफॉर्मचा वापर करतात. Gmail वर सतत नको असलेले अनेक मेल असतात. यामुळे Inbox फुल होतो आणि हे मेल डिलीट करणं सर्वात कठीण काम ठरतं. परंतु एक ट्रिकद्वारे तुम्ही Gmail Account मधून नको असलेले मेल्स आपोआप डिलीट (How to Delete Unwanted Mails On Gmail) करू शकता.
कोणतंही App घेतल्यानंतर तिथे ईमेल आयडी द्यावा लागतो. अशावेळी अनेकजण Gmail ID देतात. त्यामुळे सगळेच मेल आपल्या जीमेलवर येतात. कामाशिवाय अनेक स्पॅम मेल्सही (Spam Mail) येतात. स्पॅम मेल्स जीमेलवर मोठी जागा घेतात. तसंच या नको असलेल्या मेलमध्ये एखादा अतिशय कामाचा मेलही मिस होऊ शकतो. पण एका ट्रिकने Gmail चे स्पॅम मेल्स आपोआप डिलीट होतील.
नको असलेले Mails ऑटोमेटिकली डिलीट करण्यासाठी Gmail एक खास फीचर देतं. फिल्टर्स फॉर ऑटो-डिलीशन (Filters for Auto-Deletion) हे फीचर नको असलेले स्पॅम मेल डिलीट करण्यासाठी मदत करतं.
- सर्वात आधी Gmail Account ओपन करा.
- त्यानंतर सर्च बारमध्ये एक फिल्टर पर्याय दिसेल. कधी हा पर्याय दिसणारही नाही.
- फिल्टर पर्याय दिसत नसेल, तर फिल्टर्स अँड ब्लॉक्ड अड्रेसेज (Filters and Blocked Addresses) हा पर्याय दिसेल.
- यात Create Filter वर क्लिक करावं लागेल.
- Filter वर क्लिक केल्यानंतर सर्वात वर From लिहिलेलं असेल.
- आता त्या ईमेल्सचं नाव किंवा ईमेल अॅड्रेस टाइप करा, जे तुम्हाला डिलीट करायचे आहेत.
- आता हे नको असलेले मेल अॅड्रेस सिलेक्ट होतील. अशाप्रकारे तुम्ही स्पॅम मेल्स डिलीट करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.