नवी दिल्ली, 15 जुलै: गुगलवर (Google) प्रत्येक जण काहीना काही सर्च (Google Search) करत असतो. काही आवश्यक तर काही गोष्टी अशा असतात, ज्या कोणालाही समजू नये असं वाटतं. गुगल प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवतो, की कोणी काय सर्च केलं, कोणता व्हिडीओ पाहिला, किती वेळ ऑनलाईन होतात, कोणत्या वेळी काय सर्च केलं अशा युजरच्या अनेक गोष्टी गुगलकडे असतात. परंतु तुम्ही नेमकं काय सर्च केलं हे कोणालाही कळू द्यायचं नसेल, तर My Activity चा वापर करुन अशा सांगू न शकणाऱ्या किंवा कळू न देण्यासारख्या गोष्टी हटवू शकता. काय आहे My Activity? My Activity ही युजरची फेसबुक टाईमलाईन आहे, जी तुमच्या ऑनलाईन अॅक्टिव्हिटिची स्पष्टता देतो. हा डेटा कलेक्ट कित्येक वर्षापर्यंत ठेवता येतो, जेव्हापासून तुम्ही गुगलचा वापर सुरू केला असेल. myactivity.google.com कोणत्याही ब्राउजरवरुन अॅक्सेस केलं जाऊ शकतं. सुरक्षा उपायांसाठी युजरला एकदा पासवर्ड टाकावा लागेल. लॉगइन केल्यानंतर तुम्ही काय-काय सर्च केलं याची माहिती मिळेल.
(वाचा - Google वर या गोष्टी अजिबात शोधू नका; एका Search मुळे खावी लागू शकते जेलची हवा )
डिलीट हिस्ट्री - My Activity मधून ब्राउजिंग सर्च हिस्ट्री (Search History) डिलीट करणं अतिशय सोपं आहे. सर्वात आधी जे डिलीट करायचं आहे ते सर्च हिस्ट्री रेकॉर्डमध्ये शोधा. त्यात तीन डॉट दिसतील. ड्रॉप डाउन मेन्यू ओपन करण्यासाठी त्यावर क्लिक करा. यात Delete पर्याय निवडल्यानंतर ते कायमसाठी डिलीट होईल.
(वाचा - तु्म्हीही पॉर्न सर्च किंवा तुमच्या एक्सला स्टॉक केलं आहे का? Google ने आता उचललं मोठं पाऊल )
तसंच आतापर्यंतची संपूर्ण हिस्ट्री डिलीट करायची असल्यास, तीन डॉट मेन्यू ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करुन Delete Activity By पर्याय निवडा आणि संपूर्ण हिस्ट्री हटवण्यासाठी तिथे ऑल टाईम पर्याय निवडा, त्यानंतर संपूर्ण हिस्ट्री डिलीट होईल.