Home /News /technology /

Gmail ची ही खास ट्रिक माहितेय का? डिलीट करू शकता पाठवलेला Email

Gmail ची ही खास ट्रिक माहितेय का? डिलीट करू शकता पाठवलेला Email

चुकीच्या ईमेल आयडीवर पाठवण्यात आलेला ईमेल डिलीट करण्याचा सोपा पर्याय आहे. चुकीच्या व्यक्तीला पाठवण्यात आलेला ईमेल डिलीट किंवा Undo करता येतो.

  नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : नोकरदार किंवा व्यवसाय करणाऱ्या अनेक लोकांमध्ये ईमेल (Email) करणं हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भागच झाला आहे. ऑफिसच्या कामासाठी ईमेलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु तरीही अनेकांना जीमेलच्या (Gmail) अनेक फीचर्सबाबत माहिती नसते. घाईत किंवा एकाच वेळी अनेक ईमेल करताना चूक होते आणि एक ईमेल दुसऱ्याच चुकीच्या व्यक्तीला पोहोचतो. अशी स्थिती कोणासोबतही निर्माण होऊ शकते. परंतु यावर सोपा उपायही आहे. चुकीच्या ईमेल आयडीवर पाठवण्यात आलेला ईमेल डिलीट करण्याचा सोपा पर्याय आहे. चुकीच्या व्यक्तीला पाठवण्यात आलेला ईमेल डिलीट किंवा Undo करता येतो.

  Gmail किती वेबसाईटवर लिंक आहे, असं तपासा; Delink करण्यासाठी पाहा सोपी प्रोसेस

  ही आहे सोपी पद्धत - - चुकीचा ईमेल डिलीट करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या कंप्यूटरवर Gmail ओपन करा. - जीमेल ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला Settings चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. - इथे Undo Send चा पर्याय दिसेल.

  Gmail Alert! तुम्हालाही असा Email आला तर सावध व्हा, या नव्या फ्रॉडने अकाउंट रिकामं होण्याचा धोका

  - त्यानंतर कॅन्सलेशन टाईमचा पर्याय दिसेल. इथे युजर आपल्या वेळेनुसार टाईम सेट करू शकतात. - त्यानंतर हे फीचर अ‍ॅक्टिव्हेट होईल आणि ज्यावेळी एखाद्याला ईमेल पाठवाल, त्यावेळी खालच्या बाजूला Undo बटण दिसेल. - इथून कोणालाही पाठवण्यात आलेला ईमेल सहजपणे डिलीट केला जाऊ शकतो. जीमेल अकाउंट हॅक झालं असेल, तर ते रिकव्हर करण्यासाठी काही सोप्या पद्धती फायदेशीर ठरू शकतात. Gmail Account कसं कराल रिकव्हर - - अकाउंट हॅक झाल्यास, सर्वात आधी अकाउंट रिकव्हरी पेजवर जा. ID, पासवर्ड टाका. जर पासवर्ड आठवत नसेल, तर काही प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तर दिल्यानंतर अकाउंट परत मिळेल. विचारले गेलेले प्रश्न सिक्योरिटीसंबंधी असतील, ज्याची उत्तर अकाउंट सेटअप करताना दिलेली असतील. - रिकव्हरीसाठी युजर आपल्या रिकव्हरी ईमेल किंवा मोबाईल नंबरचा वापर करू शकतात. Gmail, युजरला त्या नंबर किंवा रिकव्हरी ईमेल आयडीवर कोड पाठवेल. हा कोड टाकल्यानंतर पासवर्ड बदलण्यासाठी विचारलं जाईल. Sign-in केल्यानंतर आपली सिक्योरिटी चेक करुन सिक्योरिटी इन्फॉर्मेशन बदला.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Gmail, Tech news

  पुढील बातम्या