मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आता तुमचा Mobile Phone चोरी झाल्यास, मोदी सरकारकडून मिळेल अशी सुरक्षा

आता तुमचा Mobile Phone चोरी झाल्यास, मोदी सरकारकडून मिळेल अशी सुरक्षा

फोन हरवला किंवा चोरी झाल्यानंतर तो परत मिळवण्यासाठी नेमकं काय करावं याबाबत अनेकांनी माहिती नसते. परंतु आता मोदी सरकारने एक अशी सुरक्षा आणली आहे, ज्याद्वारे हरवलेला फोन पुन्हा मिळवता येईल.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 18 जुलै: सध्या स्मार्टफोन (Smartphone) प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची बाब ठरला आहे. लॉकडाउनच्या काळात तर स्मार्टफोन वापरात मोठी वाढ झाली आहे. स्मार्टफोनमध्ये केवळ गाणी, व्हिडीओ, फोटो, कॉन्टॅक्ट नंबर्सच नाही, तर अनेक बँक अकाउंट्स, सोशल मीडिया अकाउंट्स, विविध पासवर्ड अशा अनेक गोष्टीही सेव्ह असतात. त्यामुळे स्मार्टफोन हरवला किंवा चोरीला गेला तर युजरसमोर मोठी समस्या निर्माण होते. फोन हरवला किंवा चोरी झाल्यानंतर तो परत मिळवण्यासाठी नेमकं काय करावं याबाबत अनेकांनी माहिती नसते. परंतु आता मोदी सरकारने एक अशी सुरक्षा आणली आहे, ज्याद्वारे हरवलेला फोन पुन्हा मिळवता येईल.

काही महिन्यांपूर्वी मोदी सरकारमधील माजी दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी महाराष्ट्रात एक वेब पोर्टल लाँच केलं होतं. या वेब पोर्टलद्वारे तुम्ही चोरी झालेल्या फोनची तक्रार करू शकतात. हा प्रोजेक्ट सुरुवातीला केवळ महाराष्ट्रासाठी करण्यात आला होता. परंतु आता याला संपूर्ण देशभरात लागू केलं जाणार आहे.

तुमच्या आयुष्यातही करा या तीन Emojis चा वापर, खिशाला कधीच नाही लागणार कात्री

फोन हरवल्यानंतर, त्यासाठी एक FIR दाखल करावी लागेल. FIR दाखल केल्यानंतर हेल्पलाईन नंबर 14422 द्वारे टेलिकॉम डिपार्टमेंटमध्ये याबाबत सूचना द्यावी लागेल. पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर, टेलिकॉम डिपार्टमेंट तुमच्या फोनचा IMEI नंबर ब्लॉक करेल. यानंतर कोणीही तुमच्या फोनवर कोणत्याही मोबाईल नेटवर्कचा वापर करू शकणार नाही. जर कोणी नेटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यास, IMEI नंबरच्या मदतीने तुमचा सेल्युलर ऑपरेटर त्या फोनला नेटवर्कचा वापर करण्यापासून रोखेल.

नवा फोन खरेदी करायचाय पण कोणता या गोंधळात आहात? अशी सुटेल तुमची समस्या

टेलिकॉम डिपार्टमेंटने 2017 जुलैमध्ये C-DoT ला मोबाईल ट्रॅकिंग प्रोजेक्ट, सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर अर्थात CEIR कडे सोपवलं होतं. CEIR हे IMEI नंबर्सचा डेटाबेस आहे. CEIR चा उद्देश मोबाईल चोरीवर रोख लावणं हा होता. CEIR सिस्टम तुमचा फोन चोरी झाल्यानंतर, तुमच्या फोनमध्ये असलेल्या सर्व सेवा ब्लॉक करतो. जर चोराने तुमच्या फोनमध्ये नवं सिम वापरलं, तर ते काम करणार नाही. IMEI नंबर बदलला तरी त्याला कोणताही फायदा होणार नाही.

First published:

Tags: Smartphone, Stolen mobile phone, Tech news