जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / तुमच्या आयुष्यातही करा या तीन Emojis चा वापर, खिशाला कधीच नाही लागणार कात्री

तुमच्या आयुष्यातही करा या तीन Emojis चा वापर, खिशाला कधीच नाही लागणार कात्री

तुमच्या आयुष्यातही करा या तीन  Emojis चा वापर, खिशाला कधीच नाही लागणार कात्री

पंजाब नॅशनल बँकेने (PNB) इमोजीचा वापर करुन स्वत:ला सायबर फ्रॉडपासून कशाप्रकारे वाचवता येऊ शकतं याबाबत ट्विट केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 जुलै: सध्या Emoji आपल्या आयुष्यात अनेकदा वापर होणारी गोष्ट आहे. युजर्स चॅट करताना ईमोजीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. याची वाढती प्यॉप्युलॅरिटी पाहता 2014 पासून World Emoji Day देखील साजरा केला जातो. दरम्यान या ईमोजीचा वापर केवळ मनोरंजनासाठीच नाही, तर आता सायबर फ्रॉडपासून (Cyber Fraud) वाचण्यासाठीही केला जाऊ शकतो. आश्चर्य वाटलं ना? पंजाब नॅशनल बँकेने (PNB) इमोजीचा वापर करुन स्वत:ला सायबर फ्रॉडपासून कशाप्रकारे वाचवता येऊ शकतं याबाबत ट्विट केलं आहे. कोरोना काळात देशात ऑनलाईन व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. एकीकडे ऑनलाईन-डिजीटल व्यवहारात वाढ होत असताना, दुसरीकडे सायबर फ्रॉडची प्रकरणंही वाढली आहेत. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. Cyber Fraud करणाऱ्यांना इमोजीच्या भाषेत कशाप्रकारे उत्तर देऊ शकता, याबाबतचं ट्विट PNB ने केलं आहे. गांधींजींच्या तीन माकडांच्या इमोजीचा वापर करण्याचा सल्ला पंजाब नॅशनल बँकेने दिला आहे. E-Ticket बुकिंगसाठी IRCTC एजेंट होण्याची संधी, महिन्याला होईल 80000 कमाई जर कोणी तुमच्याकडे OTP ची विचारणा केली, तर त्याला काही उत्तर देऊ नका. तसंच आकर्षक ऑफरच्या जाळ्यात अडकू नका. अशा ऑफर्स दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करा. त्याशिवाय KYC साठी बनावट, फेक कॉल आल्यास ते ऐकू नका, असं ट्विट PNB ने केलं आहे. Online Fraud Alert! या लिंकवर चुकूनही करू नका क्लिक, बसेल मोठा आर्थिक फटका

जाहिरात

WhatsApp युजर्सचा चॅट बॅकअप चोरी करू शकतात हॅकर्स, या फीचरने करा सिक्योर PNB ने ग्राहकांना Emoji च्या माध्यमातून सावधानतेचा इशारा दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात