मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Voter List मध्ये तुमचं नाव आहे कि नाही? घरबसल्या असं तपासा, पाहा प्रोसेस

Voter List मध्ये तुमचं नाव आहे कि नाही? घरबसल्या असं तपासा, पाहा प्रोसेस

Tech news: निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदान यादीमध्ये (Voter List) आपलं नाव असणं गरजेचं आहे. तुमचं मतदान यादीमध्ये नाव आहे की नाही हे तुम्ही ऑनलाइन सहजपणे तपासू शकता.

Tech news: निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदान यादीमध्ये (Voter List) आपलं नाव असणं गरजेचं आहे. तुमचं मतदान यादीमध्ये नाव आहे की नाही हे तुम्ही ऑनलाइन सहजपणे तपासू शकता.

Tech news: निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदान यादीमध्ये (Voter List) आपलं नाव असणं गरजेचं आहे. तुमचं मतदान यादीमध्ये नाव आहे की नाही हे तुम्ही ऑनलाइन सहजपणे तपासू शकता.

नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी: निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदान यादीमध्ये (Voter List) आपलं नाव असणं गरजेचं आहे. तुमचं मतदान यादीमध्ये नाव आहे कि नाही हे तुम्ही ऑनलाइन सहजपणे तपासू शकता. यासाठी तुम्हाला राज्याच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जावं लागेल.

काही स्टेप्स फॉलो करुन तुमच्या भागातील मतदान यादीत तुमचं नाव चेक (Check Voter List Name) करू शकता. याशिवाय दोन इतरही पद्धतीद्वारे तुमचं नाव मतदान यादीमध्ये चेक करू शकता.

हे वाचा - गृह मंत्रालयाच्या Cyber Dostकडून अलर्ट,Onlineऔषधं मागवताना या गोष्टी लक्षात ठेवा

ऑनलाइन असं तपासा मतदान यादीतील तुमचं नाव -

- सर्वात आधी राज्याच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जा.

- इथे तुमचा जिल्हा निवडा.

- त्यानंतर विकास खंडाची निवड करा.

- आता तुम्ही ज्या ठिकाणी ग्राम पंचायत किंवा इतर ठिकाणाहून असाल, त्यावर क्लिक करा.

- खाली मतदाराचं नाव टाका. तसंच आई-वडिलांचं किंवा पतीचं नाव, घर नंबर टाकावा लागेल.

- त्यानंतर शेवटी कॅप्चा कोड टाका आणि सर्च ऑप्शनवर क्लिक करा. समोर संपूर्ण डिटेल्स येतील.

हे वाचा - एकाच मोबाइल नंबरवरुन तयार होईल संपूर्ण कुटुंबाचं Aadhaar PVC Card, असा करा अर्ज

मतदान यादीमध्ये नाव तपासण्यासाठी दुसरी पद्धत -

वोटर लिस्टमध्ये नाव तपासण्यासाठी इलेक्टोरल सर्च वेबसाइटवर जा. इथे वोटर लिस्टमध्ये नाव तपासण्याच्या दोन पद्धती आहे. तुमच्या आई-वडिलांचे डिटेल्स टाकून नाव तपासू शकता किंवा ओळखपत्राचे डिटेल्स टाकून मतदान यादीतील नाव तपासू शकता.

दरम्यान, आता तुम्ही PVC Aadhaar Card अगदी सहजपणे बनवू शकता.तुम्ही केवळ एका मोबाइल नंबरवरुन आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी PVC आधार कार्ड अर्ज करू शकता. UIDAI ने आपल्या ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. PVC Aadhaar Card साठी myaadhaar.uidai.gov.in वर ऑनलाइन अर्ज करता येईल. तसंच uidai.gov.in वेबसाइटवरही Order Aadhaar PVC Card वर क्लिक करुन पुढील प्रोसेस करत पीव्हीसी कार्ड मागवू शकता.

First published:
top videos

    Tags: Aadhar card, Tech news, UIDAI, Voters choice