नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : अनेक गोष्टी ऑनलाइन
(Online Products) उपलब्ध झाल्याने ही बाब सुविधाजनक ठरते आहे. परंतु ऑनलाइन शॉपिंग
(Online Shopping) करताना अतिशय सतर्क राहणंही गरजेचं आहे. अन्यथा मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. ऑनलाइन पद्धतीने खरेदी करताना एका वस्तूसाठी चांगले डिस्काउंट-ऑफर्स दिल्या जातात. परंतु स्वस्त दरात खरेदी करण्याच्या नादात तुम्ही नकली-फेक
(Fake Products) वस्तू खरेदी करत नाही ना? याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
मागील अनेक महिन्यांपासून विषेशत: कोरोना काळापासून अनेक औषधं ऑनलाइन
(Online Medicine) मागवली जातात. ज्यावर ग्राहकांना चांगला डिस्काउंट मिळतो. परंतु नुकतंच गृह मंत्रालयाने त्यांच्या सायबर दोस्त पोर्टलवरुन
(Cyber Dost) लोकांना ऑनलाइन फ्रॉडपासून
(Online Fraud) सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सायबर दोस्तने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती देत ऑनलाइन नकली औषधांपासून
(Onlien Fake Medicine) सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
प्रीपेड पेमेंट -
ऑनलाइन औषधं मागवताना केवळ अधिकृत, विश्वासार्ह फार्मेसीतूनच औषधं मागवा. त्याशिवाय आधीच पेमेंट करण्याआधी कॅश ऑन डिलीव्हरीची निवड करा. यामुळे फ्रॉडपासून बचाव होण्यास मदत होऊ शकते.
डिस्काउंट -
डिस्काउंट मिळवण्याच्या नादात अनेक जण कितीतरी प्रकारच्या आउटलेट्सद्वारे औषधं किंवा इतर वस्तू मागवतात. परंतु असं करणं धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे डिस्काउंटच्या जाळ्यात न अडकता केवळ विश्वासार्ह फार्मेसीद्वारेच औषधं ऑर्डर करा.
मागील काही काळापासून ऑनलाइन औषधं मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत. ऑफलाइन औषधांच्या दुकानात 20 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळत असेल, तर ऑनलाइन 60 टक्क्यांपर्यंत मिळताना दिसतो. त्यामुळे लोक औषधं मोठ्या प्रमाणात ऑनलाइन ऑर्डर करतात. अशात फसवणुकीचेही अनेक प्रकार होतात. त्यामुळे ऑनलाइन औषधं मागवताना काळजी घेणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.