Home /News /technology /

तुमच्या एकाच मोबाइल नंबरवरुन तयार होईल संपूर्ण कुटुंबाचं Aadhaar PVC Card, असा करा अर्ज

तुमच्या एकाच मोबाइल नंबरवरुन तयार होईल संपूर्ण कुटुंबाचं Aadhaar PVC Card, असा करा अर्ज

तुम्ही PVC Aadhaar Card बनवू शकता. प्लास्टिक आधार कार्ड खराब होत नाही. तुम्ही केवळ एका मोबाइल नंबरवरुन आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी PVC आधार कार्ड अर्ज करू शकता. UIDAI ने आपल्या ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे.

  नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : आधार कार्ड (Aadhaar Card) अतिशय महत्त्वाचं कागदपत्र आहे. बँकेत खातं सुरू करण्यापासून ते सरकारी, खासगी सर्वच कामांसाठी आधार कार्ड गरजेचं ठरतं. प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. अनेकजण आपल्या सोबत आधार कार्ड बाळगतात. पण अनेकदा ते फाटण्याचं, खराब होण्याची भीती असते. यासाठी प्लास्टिकचं पीव्हीसी आधार कार्ड (PVC Aadhaar Card) फायद्याचं ठरतं. सहजपणे तुम्ही PVC Aadhaar Card बनवू शकता. प्लास्टिक आधार कार्ड खराब होत नाही. तुम्ही केवळ एका मोबाइल नंबरवरुन आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी PVC आधार कार्ड अर्ज करू शकता. UIDAI ने आपल्या ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. 'तुम्ही तुमच्या मोबाइल नंबरवरुन संपूर्ण कुटुंबासाठी आधार पीव्हीसी कार्ड ऑनलाइन ऑर्डर करू शकता. एका पीव्हीसी कार्डसाठी 50 रुपये पेमेंट करावं लागेल.' Aadhaar PVC card, How to Make Aadhaar PVC card, aadhar pvc card apply, PVC Aadhaar Card साठी myaadhaar.uidai.gov.in वर ऑनलाइन अर्ज करता येईल. इथे सर्वात आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल. आधार कार्ड नंबरसह कॅप्चा कोड टाकून रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करावं लागेल. आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर OTP येईल. त्यानंतर एप नवं पेज ओपन होईल. इथे Order Aadhaar PVC Card वर क्लिक करा. आता तुमच्या स्क्रिनवर आधार कार्डचे संपूर्ण डिटेल्स आणि फोटो येईल. इथे Next वर क्लिक करा आणि ऑनलाइन 50 रुपये जमा करण्याची प्रोसेस करावी लागेल.

  हे वाचा - Ration Cardमध्ये अशी Add करा पत्नी आणि मुलांची नावं,पाहा Online आणि Offlineपद्धत

  त्याशिवाय, uidai.gov.in वेबसाइटवरही Order Aadhaar PVC Card वर क्लिक करुन पीव्हीसी कार्ड मागवू शकता. Order Aadhaar PVC Card वर क्लिक करुन 12 अंकी यूनिक आधार नंबर (UID) किंवा 28 अंकी एनरोलमेंट नंबर टाका. सिक्योरिटी कोड टाका आणि चेक बॉक्सवर क्लिक करा. जर तुमच्याकडे रजिस्टर्ड मोबाइल नंबर नसेल, तर बॉक्समध्ये चेक करा. त्यानंतर अल्टरनेट मोबाइल नंबर टाका आणि Send OTP वर क्लिक करा. Terms and Conditions चेक बॉक्सवर क्लिक करा. ओटीपी वेरिफिकेशन पूर्ण करण्यासाठी Submit वर क्लिक करा. आता Make Payment वर क्लिक करा. पेमेंटनंतर डिजीटल सिग्नेचरसह एक रिसिट तयार केली जाईल ती डाउनलोड करता येईल. तुम्हाला SMS द्वारे सर्विस रिक्वेस्ट नंबर मिळेल.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Aadhar card, Aadhar card on phone, Tech news

  पुढील बातम्या