मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Gmail वर आलेला अनोळखी Email नेमका कोणी पाठवला? या ट्रिकने असं तपासा

Gmail वर आलेला अनोळखी Email नेमका कोणी पाठवला? या ट्रिकने असं तपासा

युजर्स अनोळखी ईमेल नेमके कोणी पाठवले याबाबत माहिती मिळवू शकतात. अशा ईमेलच्या  IP Address, लोकेशन याबाबतची माहिती एका ट्रिकद्वारे घेता येऊ शकते.

युजर्स अनोळखी ईमेल नेमके कोणी पाठवले याबाबत माहिती मिळवू शकतात. अशा ईमेलच्या IP Address, लोकेशन याबाबतची माहिती एका ट्रिकद्वारे घेता येऊ शकते.

युजर्स अनोळखी ईमेल नेमके कोणी पाठवले याबाबत माहिती मिळवू शकतात. अशा ईमेलच्या IP Address, लोकेशन याबाबतची माहिती एका ट्रिकद्वारे घेता येऊ शकते.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट : ऑफिस तसंच इतरही अनेक कामांसाठी Gmail चा वापर केला जातो. जीमेलवर अनेक ईमेल (Email) येत असतात. परंतु त्याबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नसते. पण हे अनोळखी ईमेल नेमके कुठून येतात, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह असतं. आता असेच अनोळखी ईमेल नेमके कोणी पाठवले याबाबत माहिती मिळवता येऊ शकते. अशा ईमेलच्या  IP Address, लोकेशन याबाबतची माहिती एका ट्रिकद्वारे घेता येऊ शकते.

Facebook -

युजर्स Facebook वरुन अनोळखी ईमेलबाबतची माहिती घेऊ शकतात. एखादा Email सतत येत असल्यास, Email ID कॉपी करुन फेसबुक सर्च बारमध्ये सर्च करता येऊ शकतात. जर त्या युजरने फेसबुक आणि ईमेल या दोघांसाठी सारख्याच Email ID चा वापर केला असेल, तर ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीची माहिती Facebook Account वरुन मिळवता येऊ शकते.

PUC कडे लक्ष न देणं पडेल भारी, RC सस्पेंडसह भरावा लागेल दंड; जाणून घ्या नवा नियम

Website -

Pipl आणि Spokio या वेबसाईट्सच्या मदतीने युजर्स ईमेल पाठवणाऱ्याची माहिती मिळवू शकतात. या वेबसाईट्सद्वारे Email च्या लोकेशनसह इतरही माहिती मिळेल.

- सर्वात आधी आलेला ईमेल ओपन करा आणि उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा.

- त्यावर क्लिक केल्यानंतर Show Original वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर एक नवी विंडो ओपन होईल. इथे IP Address मिळेल.

- हा IP Address कॉपी करुन Wolfram Alpha वेबसाईटवर जावं लागेल आणि आलेल्या ईमेलचा IP Address सर्च करावा लागेल. इथे मेलचं लोकेशनही समजेल.

इंग्रजीच नाही, तर आता तुमच्या भाषेतही बनवता येणार Aadhaar Card, जाणून घ्या सोपी प्रोसेस

दरम्यान, जगभरात पर्सनल ईमेलसाठी Gmail चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. जीमेल अकाउंट सिक्योर ठेवण्यासाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशन (Two Step Verification) चाही वापर करता येतो. Two Step Verification चं वैशिष्ट्य म्हणजे, एखाद्याला तुमचा पासवर्ड समजला, तरी तो पासवर्डद्वारे ईमेल ओपन करू शकत नाही. कारण अकाउंट ओपन करण्यासाठी पासवर्डसह व्हेरिफिकेशन कोडचीही गरज असते, जो तुमच्या मोबाईलवर येतो. जोपर्यंत व्हेरिफिकेशन कोड टाकला जात नाही, तोपर्यंत अकाउंट ओपन होणार नाही. त्यामुळे जीमेलच्या सुरक्षेसाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशन इनेबल करणं फायद्याचं ठरतं.

First published:

Tags: Gmail, Google, Tech news