मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमचा फोन नंबर Facebook Data Leaked मध्ये सामिल आहे की नाही; असं तपासा

तुमचा फोन नंबर Facebook Data Leaked मध्ये सामिल आहे की नाही; असं तपासा

106 देशांतील डेटा लीकमध्ये भारताचाही समावेश आहे. 533 मिलियन डेटा हॅक झालेल्या युजर्सपैकी 6 मिनियन युजर्स भारतातील आहेत. परंतु त्या डेटा लीकमध्ये तुमच्याही फोनचा डेटा लीक झालाय का हे ओळखता येऊ शकतं.

नवी दिल्ली, 8 एप्रिल : नुकतंच फेसबुक डेटा लीकमध्ये (Facebook Data leaked)533 मिलियन युजर्सचा डेटा हॅक झाल्याची माहिती समोर आली. हॅक डेटामध्ये युजरचं नाव, ईमेल, फोन नंबर, लोकेशन अशा गोष्टी सामिल आहेत. हा डेटा एका लो हॅक फोरमवर फ्रीमध्ये टाकण्यात आला आहे, जेथे कोणीही तुमचा डेटा कोणतीही रक्कम न देता अ‍ॅक्सेस करू शकतो. 106 देशांतील डेटा लीकमध्ये भारताचाही समावेश आहे. 533 मिलियन डेटा हॅक झालेल्या युजर्सपैकी 6 मिनियन युजर्स भारतातील आहेत. परंतु त्या डेटा लीकमध्ये तुमच्याही फोनचा डेटा लीक झालाय का हे ओळखता येऊ शकतं.

सर्व लीक झालेला डेटा Have I Been Pwned? वेबसाईटच्या डेटाबेसमध्ये जोडण्यात आला आहे. Have I Been Pwned? ही एक वेबसाईट आहे, जी युजर्सला हे सांगण्यास मदत की त्यांचा डेटा लीक झाला आहे की नाही. जर तुम्हालाही तुमचा फोन किंवा ईमेल फेसबुकच्या डेटा लीकमध्ये सामिल आहे की नाही हे जाणून घ्यायचं असेल, तर काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

(वाचा - तुमच्या गैरहजेरीत तुमचा फोन कोणी वापरला? क्षणात असा लावा शोध)

- Have I Been Pwned? वेबसाईटवर जावं लागेल.

- एक इनपुट बॉक्स दिसेल. तिथे तुमचा फोन नंबर इंटरनॅशनल फॉर्मेटमध्ये टाकावा लागेल. जर तुमचा नंबर 1234567890 आहे, तर तो +911234567890 असा टाकावा लागेल.

- जर तुमचा फोन नंबर डेटा लीकमध्ये सामिल असेल, तर खाली मेसेजमध्ये शो होईल आणि डेटा लीकमध्ये नसेल, तरीही तसं खाली मेसेजमध्ये सांगितलं जाईल.

(वाचा - फेसबुक डेटा लीक प्रकरणानंतर आता WhatsApp Scam समोर; या स्कॅमपासून कसं वाचाल?)

Have I Been Pwned? मध्ये तुमचा फोन नंबर टाकणं सेफ आहे का?

Have I Been Pwned? चा अनेक पासवर्ड मॅनेजरद्वारा वापर केला जातो. ही वेबसाईट तुमच्या ईमेल किंवा फोन नंबरवरुन, तुमचा फोन किंवा ईमेल डेटा लीकमध्ये सामिल आहे की नाही याची माहिती मिळवते. तुम्ही या वेबसाईटची प्रायव्हसी पॉलिसीही वाचू शकता. तसंच तुमचा फोन नंबर किंवा ईमेल पब्लिक्ली सर्चमध्ये सामिल न होण्यासाठी otp in करू शकता.

First published:
top videos

    Tags: Facebook, Tech news