मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमच्या गैरहजेरीत तुमचा फोन कोणी वापरला? क्षणात असा लावा शोध

तुमच्या गैरहजेरीत तुमचा फोन कोणी वापरला? क्षणात असा लावा शोध

आता तुमचा फोन तुमच्या गैरहजेरीत कोणी अनलॉक करण्याचा प्रयत्न केला हे जाणून घेता येऊ शकतं. कधी, कोणी तुमचा फोन अनलॉक करुन कोणतं अ‍ॅप वापरलं याबाबत आता माहिती मिळू शकते.

आता तुमचा फोन तुमच्या गैरहजेरीत कोणी अनलॉक करण्याचा प्रयत्न केला हे जाणून घेता येऊ शकतं. कधी, कोणी तुमचा फोन अनलॉक करुन कोणतं अ‍ॅप वापरलं याबाबत आता माहिती मिळू शकते.

आता तुमचा फोन तुमच्या गैरहजेरीत कोणी अनलॉक करण्याचा प्रयत्न केला हे जाणून घेता येऊ शकतं. कधी, कोणी तुमचा फोन अनलॉक करुन कोणतं अ‍ॅप वापरलं याबाबत आता माहिती मिळू शकते.

नवी दिल्ली, 8 एप्रिल : काही लोक आपण समोर नसताना, आपला फोन अनलॉक करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आता तुमचा फोन तुमच्या गैरहजेरीत कोणी अनलॉक करण्याचा प्रयत्न केला हे जाणून घेता येऊ शकतं. यासाठी एका अ‍ॅप डेव्हलपरने अ‍ॅप बनवलं आहे, जे हे काम करतं. कधी, कोण तुमचा फोन अनलॉक करुन कोणतं अ‍ॅप वापरतो याबाबत आता माहिती मिळू शकते.

जर कोणी तुमचा स्मार्टफोन अनलॉक करण्याचा प्रयत्न करत असेल, तर हे अ‍ॅप त्या व्यक्तीचा फोटो क्लिक करेल. त्यासाठी या अ‍ॅपला फ्रंट कॅमेराचा अ‍ॅक्सेस द्यावा लागतो. रिपोर्टमध्ये युजरला त्या व्यक्तीचा फोटो दिसेल, ज्याने फोन अनलॉक करण्याचा प्रयत्न केला आहे.

या अ‍ॅपचं नाव Who touched my phone असं आहे. या अ‍ॅपला Midnightdev ने तयार केलं आहे. हे अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर याला काही परमिशन्स द्यावा लागतात. हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर अतिशय प्रसिद्ध असून याला 4.8 रेटिंग मिळाले आहे. या अ‍ॅपसाठी 1.18 लाख लोकांनी रिव्ह्यूही दिला आहे. हे अ‍ॅप वापरणंही अतिशय सोपं आहे. अ‍ॅप वापरण्यापूर्वी याला आवश्यक त्या परमिशन्स द्याव्या लागतात. त्यानंतर जो कोणी तुमच्या गैरहजेरीत फोन अनलॉक करण्याचा प्रयत्न करेल, त्याबाबत लगेच अ‍ॅपद्वारे याचा रिपोर्ट युजरला मिळेल.

(वाचा - WhatsApp वेरिफाय करण्याच्या नावाने होतोय Phone Hack, चुकूनही करू नका हे काम)

हे अ‍ॅप रिपोर्ट सेव्ह करतं. जर एखाद्याने फोन अनलॉक केला, तर त्याने कोणतं अ‍ॅप ओपन केलं, याबाबतही माहिती मिळेल. अनलॉक करण्यासाठी किती वेळा प्रयत्न केले गेले, तसंच कोणते पॅटर्न ड्रॉ करण्यात आले अशी सर्व माहिती या अ‍ॅपमध्ये मिळते. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरुन डाउनलोड केलं जाऊ शकतं.

हे अ‍ॅप फ्री आहे, परंतु याचे काही फीचर्स प्रीमियम आहेत. बेसिक फीचर्स यात फ्री देण्यात आले आहेत. त्याशिवाय प्रीमियम फीचर्सच्या अ‍ॅक्सेससाठी पैसे द्यावे लागतील.

First published:
top videos

    Tags: Smartphone, Tech news