Home /News /technology /

तुमचं Wi-Fi इतर कोणी चोरुन वापरतंय का? असं तपासा

तुमचं Wi-Fi इतर कोणी चोरुन वापरतंय का? असं तपासा

तुम्ही लावलेल्या वाय-फायचा इतर कोणी चोरी वापर करत असेल तर? Wi-Fi योग्यरित्या सुरक्षित ठेवलं नाही, तर इतर कोणीही व्यक्ती तुमचं Wi-Fi वापरु शकतं. असं होऊ नये यासाठी ते सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

  नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : प्रत्येक स्मार्टफोन युजर इंटरनेटचा (Internet) वापर करतो. कोरोनामुळे अनेकांना वर्क फ्रॉम होमची (Work From Home) सुविधा मिळाली. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शाळा, क्लासेस सुरू होते. अनेक काम, मीटिंग्स ऑनलाइन झाल्याने घरात ब्रॉडबँड, वाय-फाय (Wi-Fi) राउटर्सची (Routers) संख्याही वाढली. चांगला, फास्ट इंटरनेट स्पीड (Internet speed) मिळण्यासाठी अनेक जण घरी अधिक पैसे देऊन वाय-फाय, ब्रॉडबँड लावून घेतात. पण तुम्ही लावलेल्या वाय-फायचा इतर कोणी चोरी वापर करत असेल तर? Wi-Fi योग्यरित्या सुरक्षित ठेवलं नाही, तर इतर कोणीही व्यक्ती तुमचं Wi-Fi वापरु शकतं. असं होऊ नये यासाठी ते सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. - तुमचं वाय-फाय कनेक्शन स्लो झालंय का? वाय-फाय स्लो होण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. सर्वर डाउन होणं, नेटवर्कमध्ये भिंती, इतर काही ऑब्जेक्ट येणं, तसंच इतर कोणी तुमच्या कनेक्शनवर लपून वाय-फाय वापरत असेल तरी स्पीड स्लो होऊ शकतो.

  हे वाचा - एकाच मोबाइल नंबरवरुन तयार होईल संपूर्ण कुटुंबाचं Aadhaar PVC Card, असा करा अर्ज

  - जे डिव्हाइस तुमच्या प्रायव्हेट नेटवर्कशी जोडलेलं आहे, ते एका यूनिक आयपी आणि मॅक अॅड्रेससह येतं. राउटर सेटिंगच्या माध्यमातून ते कनेक्टेड डिव्हाइसच्या लिस्टमध्ये दिसू शकतं. त्यामुळे तुम्ही तुमचं वाय-फाय कोण वापरतं हे ओळखू शकता. कनेक्टेड डिव्हाइसच्या लिस्टमध्ये नाव दिसतं नसलं, तरी तुम्ही Wi-Fi  कोण वापरतं हे तपासू शकता. कनेक्टेड डिव्हाइसची संख्या चेक करुन तुम्ही नाव नसतानाही वाय-फाय वापरत असलेल्या व्यक्तीचा शोध घेऊ शकता.

  हे वाचा - 25 लाखहून अधिक लोकांनी वापरला हा Password, हॅकर्सकडून एका सेकंदात होतो क्रॅक

  स्ट्राँग पासवर्ड - WPA2 एक एन्क्रिप्शन प्रोटोकॉल आहे, याचा अर्थ 'वाय-फाय प्रोटेक्टेड अॅक्सेस' आहे. WPA2 जुने प्रोटोकॉल WPA, WEP इत्यादीच्या तुलनेत नवीन आणि अधिक सुरक्षित आहे. तुम्ही Wi-Fi Router वर WPA2 सिक्योरिटी इन्स्टॉल करुन एका स्ट्राँग पासवर्डने वाय-फाय सुरक्षित करण्याची आवश्यकता आहे.

  हे वाचा - कोल्डड्रिंकच्या रिकाम्या कॅनने वाढेल Wi-Fi Speed? पाहा ही जुगाड ट्रिक

  इंटरनेट मॉनिटरिंग सॉफ्टवेअर - AirSnare सारख्या काही सॉफ्टवेअरचा उपयोग तुम्ही तुमच्या नेटवर्कवर एखाद्या अनोळखी डिव्हाइसचा तपास करण्यासाठी करू शकता. या सॉफ्टवेअरद्वारे तुम्हाला अलर्ट मिळू शकतो.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: High speed internet, Internet use, Tech news

  पुढील बातम्या