Home /News /technology /

कोल्डड्रिंकच्या रिकाम्या कॅनने वाढेल Wi-Fi Speed? पाहा ही जुगाड ट्रिक

कोल्डड्रिंकच्या रिकाम्या कॅनने वाढेल Wi-Fi Speed? पाहा ही जुगाड ट्रिक

तुमच्या घरात WiFi आहे परंतु त्याच्या स्लो स्पीडमुळे (WI-Fi Speed) समस्या येत असल्यास त्यासाठी एक कमालची जुगाड ट्रिक वापरु शकता. या जुगाडच्या मदतीने तुम्ही काही वेळातच WiFi चा चांगला स्पीड मिळवू शकता.

  नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी: आजकाल जवळपास सर्वच कामं स्मार्टफोनवर (Smartphone) केली जातात. पण फोनमध्ये इंटरनेटची (Internet) सुविधा नसेल, तर कामं पूर्ण अडकू शकतात. कोरोना काळात अनेकांना वर्क फ्रॉम होमची सुविधा मिळाली ती अद्यापही सुरू आहे. Work From Home करताना घरात WiFi असेल, तर इंटरनेट स्पीड (Internet Speed) चांगला मिळतो. तुमच्या घरातही WiFi आहे परंतु त्याच्या स्लो स्पीडमुळे (WI-Fi Speed) समस्या येत असल्यास त्यासाठी एक कमालची जुगाड ट्रिक वापरु शकता. या जुगाडच्या मदतीने तुम्ही काही वेळातच WiFi चा चांगला स्पीड मिळवू शकता. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर तर काही अतिशय कामाचे असतात. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला जात आहे. या व्हिडीओमध्ये कोल्डड्रिंकच्या एका रिकाम्या कॅनने तुम्ही तुमच्या घरातील वाय-फायचा स्पीड वाढवू शकता, असा दावा करण्यात आला आहे.

  हे वाचा - Alert! तुमच्या अकाउंटचा Password यापैकी एक नाही ना? असेल तर लगेच करा बदल

  सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यानुसार, वाय-फायचा स्पीड वाढवण्यासाठी सर्वात आधी कोल्डड्रिंकचा रिकामा कॅन असणं आवश्यक आहे. हा रिकामा कॅन मधोमध कापा आणि त्यानंतर वाय-फायच्या राउटरचा अँटिना या कॅनमध्ये फीट करा. इतकंच करुन काही वेळ वाट पाहा. थोड्या वेळात तुमच्या WiFi चा स्पीड आणि रेंज दोन्ही वाढेल, असा दावा सोशल मीडियावरील व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. तुम्हीही ही ट्रिक वापरुन पाहू शकता.

  हे वाचा - वर्षभरापूर्वी आलेला FASTag आता बंद होणार? पुन्हा बदलणार Toll Collection ची पद्धत

  दरम्यान, एका रिपोर्टनुसार, पब्लिक वायफायद्वारे (Public Wi-Fi) हॅकर्स (Hackers) युजर्सचा पर्सनल डेटा चोरी करत आहेत. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या वाय-फायला पासवर्डची सुरक्षा नसते. त्यामुळे युजरने वाय-फाय कनेक्ट केल्यानंतर त्याचा MAC Address आणि IP Address हॅकर्सकडे जाऊ शकतो. पब्लिक स्पेसच्या ठिकाणी फ्री Wi-Fi चा वापर करत असाल, तर त्यावेळी स्मार्टफोनवरून कोणताही ऑनलाईन व्यवहार करू नका. फ्री वाय-फाय कनेक्शन वापरण्याआधी त्याची विश्वासार्हता चेक करा. ते कोणत्या संस्थेचं आहे किंवा कोणाच्या नावाने आहे किंवा अजून किती लोक याचा वापर करतात याची खात्री करा.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Hacking, High speed internet, Internet, Smartphones, Tech news

  पुढील बातम्या