नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी : डिजीटल जगात पासवर्ड
(Password) सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पासवर्ड जितका स्ट्राँग असेल
(Strong Password), तितकी सर्व अकाउंट सुरक्षित राहण्यास मदत होते. डिजीटल जगात हॅकर्सची
(Hackers) बारीक नजर असून लहानशीही चूक मोठं नुकसान करू शकते. त्यामुळे सुरक्षित राहण्यासाठी स्ट्राँग पासवर्डचा वापर करणं गरजेचं आहे.
अनेक जण साधा-सोपा लक्षात राहील असा पासवर्ड तयार करतात. सोपे पासवर्ड हॅकर्सकडून लगेच काही सेकंदात क्रॅक केले जाऊ शकतात. पासवर्ड्सवर लक्ष ठेवणारी सिक्योरिटी कंपनी ‘नॉर्डपास’
(NordPass) ने याबाबत रिपोर्ट दिला आहे.
NorPass.Com ने 2021 ची 200 टॉप कॉमन पासवर्ड
(Top 200 Most Common Password) लिस्ट जारी केली आहे. अनेक लोक कित्येक वर्ष सोपा पासवर्ड वापरत असल्याचं नॉर्डपासने म्हटलंय. नॉर्डपासने या लिस्टमध्ये हे कॉमन पासवर्ड किती वेळा वापरले गेले आहेत आणि हे हॅक करण्यासाठी किती वेळ वेळ याची माहिती दिली आहे.
ही लिस्ट अनेक देशांच्या पासवर्डच्या रिसर्चनंतर तयार करण्यात आली आहे. यात अनेक भारतीय पासवर्ड आहेत. भारतीय पासवर्डमध्ये अनेक लोक अतिशय कॉमन नावांचा वापर करतात. या नावांमध्ये ते ईमेल, बँक अकाउंट अशा गोष्टींचा पासवर्ड म्हणून वापर करतात.
Weak Password list -
भारतात कॉमन पासवर्ड्समध्ये 123456, india123, krishna, India123, sairam, omsairam, jaimatadi, saibaba, ganesh, abhishek, priyanka, tinkle, rajesh, deepak, lakshmi, hanuman, sweety, waheguru, hariom, balaji, jaihanuman, ganesha, godisgreat, sriram, Pankaj, Pradeep, Praveen, Rashmi, Rahul, Rajkumar, Rakesh, Ramesh, Rajesh, Sachin, Sanjay, Sandeep, Suresh, Santosh, Simran, Sandhya, Sunny, Vishal अशी नावं पासवर्ड म्हणून सामिल आहेत. अशा प्रकारच्या 200 कॉमन पासवर्डची लिस्ट नॉर्डपासने जारी केली.
तसंच हे कॉमन पासवर्ड किती लोक वापरतात तसंच हा पासवर्ड क्रॅक करण्यासाठी किती वेळ लागतो हेदेखील NordPass ने सांगितलं. 123456 या पासवर्डचा वापर 25 लाखहून अधिक लोक करतात आणि हा केवळ एका सेकंदात क्रॅक करता येऊ शकतो.
iloveyou पासवर्ड 1 लाख 6 हजारहून जास्त लोक वापरत आहेत. हा पासवर्डही एका सेकंदात हॅक करता येतो. पासवर्ड असा password 17 लाख लोक वापरतात. हा पासवर्डही सेकंदात हॅक केला जातो.
india123 हा पासवर्ड 1.26 लाख लोक वापरतात आणि हा 17 मिनिटांत क्रॅक केला जाऊ शकतो. sairam पासवर्डचा जवळपास 50 हजार वेळा वापर केला जात आहे आणि हा पासवर्ड 2 मिनिटांत हॅक केला जाऊ शकतो. jaimatadi पासवर्ड 40 हजारहून अधिक वेळा वापरला जात आहे आणि हा एका दिवसांत क्रॅक करता येतो.
Strong Password -
पासवर्ड स्ट्राँग ठेवणं अतिशय गरजेचं आहे. पासवर्ड कमीत-कमी 8 शब्द-अकांचा असावा. या 8 अंक-शब्दांमध्ये कॅपिटल-स्मॉल लेटर्स, नंबर्स, कॅरेक्टरचा समावेश असावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.