मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आता WhatsApp वरच तपासा Bank Balance, जाणून घ्या सोपी प्रोसेस

आता WhatsApp वरच तपासा Bank Balance, जाणून घ्या सोपी प्रोसेस

इतर पेमेंट अ‍ॅपप्रमाणेच व्हॉट्सअ‍ॅपनेही आता भारतात UPI पेमेंटची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. यूपीआय पेमेंटचा वापर करत WhatsApp द्वारे पैसे पाठवता किंवा मागवताही येतात. तसंच बँक अकाउंट बॅलेन्सही चेक करता येतो.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणार इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आतापर्यंत अनेक नवे फीचर्स युजर्ससाठी आणले आहे. WhatsApp चा वाढता वापर आणि युजर्सच्या गरजा लक्षात घेता व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या अ‍ॅपमध्ये पेमेंट करण्याचाही पर्याय दिला. Google Pay, Paytm, PhonePay या इतर पेमेंट अ‍ॅपप्रमाणेच व्हॉट्सअ‍ॅपनेही आता भारतात UPI पेमेंटची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. यूपीआय पेमेंटचा वापर करत WhatsApp द्वारे पैसे पाठवता किंवा मागवताही येतात. तसंच बँक अकाउंट बॅलेन्सही चेक करता येतो.

बापरे..! या स्मार्टफोनवर WhatsApp चालूच शकणार नाही; यादीत तुमचा फोन तर नाही ना?

जर तुम्ही WhatsApp Account मध्ये UPI Payment अद्यापही सेट केलं नसेल, तर हा पेमेंट ऑप्शन सेट करू सकता. व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंगमध्ये जावून हा पर्याय निवडता येईल.

कसं कराल WhatsApp Payment -

- सर्वात आधी उजव्या बाजूला वर असलेल्या तीन लाइनवर क्लिक करावं लागेल.

- त्यानंतर ज्या बँक अकाउंटला तुमचा WhatsApp नंबर जोडलेला आहे, तोच फोन नंबर युजर या WhatsApp Payment मध्ये जोडू शकतात. म्हणजे ज्या नंबरवर तुमचं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट आहे, त्या नंबरवरच तुमचा बँक अकाउंट नंबर रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे.

- शेवटी UPI PIN सेट करावा लागेल. या PIN द्वारेच ट्रान्झेक्शन करता येईल. तसंच बँक अकाउंट बॅलेन्सही चेक करता येईल.

WhatsApp युजर्ससाठी धोक्याचा इशारा, अधिक फीचरच्या नादात वाढतील समस्या

WhatsApp द्वारे असा तपासा बँक अकाउंट बॅलेन्स -

- सर्वात आधी WhatsApp ओपन करा. इथे पेमेंट पर्यायावर जा.

- त्यानंतर बँक अकाउंट सिलेक्ट करावं लागलं.

- इथे View Account Balance वर क्लिक करा. आता PIN टाकावा लागेल. PIN टाकल्यानंतर बँक अकाउंट बॅलेन्स दिसेल.

First published:

Tags: Tech news, Whatsapp pay, WhatsApp user