मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp युजर्ससाठी धोक्याचा इशारा, अधिक फीचरच्या नादात वाढतील समस्या

WhatsApp युजर्ससाठी धोक्याचा इशारा, अधिक फीचरच्या नादात वाढतील समस्या

दुसरा पर्याय अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेट करण्याचा आहे. त्यासाठी युजरला कंपनीला "Lost/Stolen: Please deactivate my account" असा ईमेल करावा लागेल आणि फोन नंबर आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये (+91) लिहावा लागेल. एकदा डिअ‍ॅक्टिव्हेट झाल्यानंतरही Contacts तुमचं प्रोफाईल पाहू शकतात आणि मेसेज पाठवू शकतात. हे 30 दिवसांपर्यंत Pending State मध्ये राहील. जर युजरने 30 दिवसांपर्यंत अकाउंट सक्रिय केलं नाही, तर ते अकाउंट पूर्णपणे हटवलं जातं.

दुसरा पर्याय अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेट करण्याचा आहे. त्यासाठी युजरला कंपनीला "Lost/Stolen: Please deactivate my account" असा ईमेल करावा लागेल आणि फोन नंबर आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये (+91) लिहावा लागेल. एकदा डिअ‍ॅक्टिव्हेट झाल्यानंतरही Contacts तुमचं प्रोफाईल पाहू शकतात आणि मेसेज पाठवू शकतात. हे 30 दिवसांपर्यंत Pending State मध्ये राहील. जर युजरने 30 दिवसांपर्यंत अकाउंट सक्रिय केलं नाही, तर ते अकाउंट पूर्णपणे हटवलं जातं.

सायबर सिक्योरिटी फर्म Kaspersky ने एक पॉप्युलर व्हॉट्सअ‍ॅप मॉड शोधला हा युजर्सच्या डिव्हाईसमध्ये मालवेअर पोहोचवण्याचं काम करतो.

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एका धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. सायबर सिक्योरिटी फर्म Kaspersky ने एक पॉप्युलर व्हॉट्सअ‍ॅप मॉड शोधला हा युजर्सच्या डिव्हाईसमध्ये मालवेअर पोहोचवण्याचं काम करतो. या मॉडचं नाव FMWhatsApp असून यात असलेला Triada Trojan मालवेअर युजर्सच्या डिव्हाईसमधून डेटा चोरी करतो.

मॉड्स एखाद्या अ‍ॅपचं युजर क्रिएडेट वर्जन असतं. हे वर्जन कंपनी अप्रुव करत नाही. पण या अ‍ॅपमध्ये काही अधिक फीचर मिळत असल्याने अनेक युजर्स ओरिजनल अ‍ॅपच्या तुलनेत अशा अ‍ॅपकडे अधिक वळत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Kaspersky ने दिलेल्या माहितीनुसार, मॉड युजरच्या डिव्हाईसमध्ये व्हायरस असणाऱ्या जाहिराती चालवतात आणि यात अशा काही अ‍ॅड असतात, ज्या युजरला कोणत्याच माहितीशिवाय बॅकग्राउंडमध्ये सुरू राहतात. चिंतेची बाब म्हणजे बॅकग्राउंडमध्ये चालणाऱ्या अ‍ॅड युजरच्या फोनमध्ये असलेल्या डेटाला अ‍ॅक्सेस करण्यासह तो चोरीही करू शकतात.

MS Office द्वारे हॅकिंगचा धोका, Microsoft कडून Windows युजर्सला सावधानतेचा इशारा

SMS वाचण्याची परवानगी -

FMWhatsApp युजरचं डिव्हाईस अ‍ॅक्सेस करण्यासाठी SMS वाचण्याची परवानगी मागतं आणि युजर्सकडूनही या फेक अ‍ॅपला परवानगी दिली जाते. परवानगी दिल्यामुळे या फेक अ‍ॅपमध्ये असलेल्या सर्व मालवेअरलाही SMS चा अ‍ॅक्सेस मिळतो. याचाच फायदा घेत हॅकर मालवेअरच्या मदतीने युजरच्या टेक्स्ट मेसेज बॉक्समध्ये येणाऱ्या वेरिफिकेशन कोडचा वापर करुन प्रीमियम सब्सक्रिप्शन घेतात.

सिक्योरिटी एक्सपर्ट Kaspersky ने युजर्सला या धोक्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. अनेक युजर्सला या फेक अ‍ॅपच्या धोक्याबाबत माहिती नसते आणि युजर्स केवळ अधिक फीचर मिळण्याच्या नादात हे अ‍ॅप डाउनलोड करतात. युजर्सनी कोणतंही अ‍ॅप अधिकृत प्ले स्टोर वरुनचं डाउनलोड करण्याचा सल्ला एक्सपर्टकडून देण्यात आला आहे.

First published:

Tags: Whatsapp alert, WhatsApp chats