नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : WhatsApp ने एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड बॅकअप (End-to-end encrypted backups) पूर्ण केल्याची घोषणा केली आहे. लवकरच हे फीचर युजर्ससाठी प्रायव्हसी आणि सिक्योरिटी प्रोटेक्शनच्या अतिरिक्त लेअरला रोलआउट करण्यास सुरुवात करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. व्हॉट्सअॅपप्रमाणे इतर कोणतीही मेसेजिंग सेवा अशी एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड बॅकअप सुविधा युजर्सच्या सुरक्षेसाठी देऊ शकत नसल्याचंही कंपनीने म्हटलं आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे नवं फीचर मोठ्या स्तरावर आधी टेक्निकल कम्युनिटीसमोर आणलं जाईल. त्यानंतर कंपनी हे फीचर आपल्या बीटा टेस्टर्स आणि त्यानंतर इतर युजर्ससाठी लाँच करेल.
जे युजर्स आपल्या चॅट हिस्ट्रीचा एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह बॅकअपचा पर्याय निवडतात, त्यांचा बॅकअप इतर कोणीही अनलॉक करू शकत नाही. कंपनीदेखील हा बॅकअप अनलॉक करू शकत नसल्याचं सांगण्यात आलं आहे. येत्या आठवड्यात iOS आणि Android युजर्ससाठी फीचर रोलआउट केलं जाईल.
दरम्यान, व्हॉट्सअॅप प्रायव्हसीच्या वैशिष्ट्यांवर काम करत आहे. आता युजर्स कॉन्टॅक्टमधूनच आपलं लास्ट सीन, प्रोफाईल फोटो आणि स्टेटस अपडेट लपवू शकतील. WABetaInfo कडून मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप आपली प्रायव्हसी अपडेट करण्याचं काम करत आहे. हे अपडेट अँड्रॉईड आणि iOS दोघांसाठी असेल. या अपडेटमध्ये ‘My Contact Except….’ हा पर्याय मिळेल, जो आधी केवळ Everyone, my contacts आणि Nobody असा होता.
WhatsApp वर लवकरच इन्स्टाग्रामसारखे मेसेज रिअॅक्शन फीचर (Message Reaction Feature) मिळणार आहे. WABetaInfo च्या म्हणण्यानुसार, कंपनी अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हींसाठी या फीचरवर काम करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: WhatsApp features, Whatsapp News