मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

बापरे..! या स्मार्टफोनवर WhatsApp चालूच शकणार नाही; यादीत तुमचा फोन तर नाही ना?

बापरे..! या स्मार्टफोनवर WhatsApp चालूच शकणार नाही; यादीत तुमचा फोन तर नाही ना?

जर तुमचा फोन कालबाह्य ऑपरेटिंग सिस्टमवर चालत असेल तर लवकरच तुमच्या फोनवर व्हॉट्सअॅप चालणे बंद होऊ शकते. तसेच तुम्ही स्मार्टफोन अपडेट केला नाही तरी देखील व्हॉट्सअॅपचा अॅक्सेस गमावू शकता.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 04 सप्टेंबर : इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप (WhatsApp) सध्या जगभरातील लाखो वापरकर्ते वापरत आहेत. कंपनी आपल्या युजरना अधिकाधिक चांगला अनुभव देण्यासाठी, नवीन वैशिष्ट्ये देण्यासाठी अॅपमध्ये सतत अपडेट आणते. मात्र, लवकरच व्हॉट्सअॅप अनेक मोबाईलवर चालू शकणार नाही. अशा युजरना त्यांचे अगोदरचे चॅटही पाहता येणार नाही. त्यामुळं अनेकांना धक्का बसला आहे. व्हॉट्सअॅपवर नेमकं कोणत्या फोनवर चालणार नाही याची माहिती घेऊ.

यामुळे व्हॉट्सअॅपवर बंदी घालण्यात येणार आहे

जर तुमचा फोन कालबाह्य ऑपरेटिंग सिस्टमवर चालत असेल तर लवकरच तुमच्या फोनवर व्हॉट्सअॅप चालणे बंद होऊ शकते. तसेच तुम्ही स्मार्टफोन अपडेट केला नाही तरी देखील व्हॉट्सअॅपचा अॅक्सेस गमावू शकता. त्यामुळं सर्वच अॅप नीट कार्यरत राहण्यासाठी स्मार्टफोन अपडेट करणे गरजेचे आहे. जे स्मार्टफोन अपडेट करणार नाहीत त्यांना एकतर नवीन स्मार्टफोन खरेदी करावा लागेल किंवा व्हॉट्सअॅप व्यतिरिक्त इतर अॅपचा वापर करावा लागेल. आऊटडेटेड मोबाईल वापरकर्त्यांना नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी फक्त दोन महिने अवधी आहे. नवीन मोबाईल खरेदी केला तर काही अडचण येणार नाही. पण, मोबाईल खरेदी केला नाहीतर मात्र अडचणी निर्माण होणार आहेत.

या मोबाईलवर व्हॉट्सअॅप काम करणे होईल बंद

40 हून अधिक मोबाईल फोन आहेत, ज्यावर व्हॉट्सअॅप काम करणे बंद होईल. हे फोन iOS आणि Android दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमचे आहेत. द सनच्या रिपोर्टनुसार, अँड्रॉइड 4.0.4 आणि त्यापेक्षा जुने प्रकार चालवणाऱ्या स्मार्टफोन वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅप सपोर्ट मिळणे बंद होईल. Apple च्या बाबतीत बोलायचे झाल्यास iOS 9 वर चालणारे iPhones बूट होतील.

हे वाचा - वयाच्या 7 व्या वर्षी बालविवाह, 12 वर्षांनंतर कोर्टाच्या निर्णयामुळे तरुणीला मिळालं स्वातंत्र्य

या मोबाईलवर व्हॉटस्अप चालणार नाही

>> सॅमसंग गॅलेक्सी एस 3 मिनी, ट्रेंड II, ट्रेंड लाइट, कोर, एस 2

>> LG Optimus F7, F5, L3 II Dual, F7 II, F5 II

>> सोनी एक्सपीरिया

>> Huawei Ascend Mate आणि Ascend D2

>> Apple iPhone SE, 6S आणि 6S Plus

व्हॉट्सअॅपने बरीच नवीन वैशिष्ट्ये चालू करण्याचे आणि काही गोष्टी नवीन लाँच करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी हे जुने फोन सपोर्टेड नाहीत त्यामुळं अॅप योग्यरित्या चालू शकणार नाही. तसेच, व्हॉट्सअॅप या फोनला योग्य सुरक्षा किंवा एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सुविधा देऊ शकत नाही.

First published:

Tags: Whats app news, Whatsapp alert, WhatsApp features