Home /News /technology /

WhatsApp Payment: तुमचा UPI PIN विसरलात? काही मिनिटांत असा बदला

WhatsApp Payment: तुमचा UPI PIN विसरलात? काही मिनिटांत असा बदला

WhatsApp UPI PIN लक्षात नसेल, तर तो बदलण्याचा पर्याय युजरकडे आहे. काही सोप्या स्टेप्सद्वारे युजर UPI PIN बदलू शकतात.

  नवी दिल्ली, 1 डिसेंबर : जगभरात WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. WhatsApp चा वापर आता केवळ मेसेजिंगसाठी न होता फोटो, व्हिडीओ, फाइल्स आणि पेमेंटसाठीही केला जातो. इन्स्टंट मेसेजिंग App WhatsApp ने WhatsApp Payment फीचर सुरू केलं आहे. WhatsApp Payment चा वापर करण्यासाठी बँक-टू-बँक मनी ट्रान्सफर इनेबल करण्यासाठी एक यूनिफाइड पेमेंट इंटरफेस UPI ची गरज असेल. UPI 4 किंवा 6 अंकी एक नंबर असतो, जो ऑनलाइन पेमेंट करण्यापूर्वी टाकावा लागतो.

  WhatsApp वर Video Status असं करा डाउनलोड; पाहा प्रोसेस

  WhatsApp तुमच्या बँक अकाउंटमधून रजिस्टर्ड मोबाइल नंबरद्वारे बँक अकाउंटची माहिती घेतं. जर तुमच्याकडे आधीपासूनच UPI PIN असेल, तर WhatsApp मध्ये नवा पीन तयार करण्याची गरज नाही. पण UPI PIN लक्षात नसेल, तर तो बदलण्याचा पर्याय युजरकडे आहे. काही सोप्या स्टेप्सद्वारे युजर UPI PIN बदलू शकतात.

  तुमचा कोणताही फोटो WhatsApp Stickers मध्ये बनवता येणार, पाहा काय आहे सोपी Trick

  WhatsApp Payment साठी असा बदला UPI PIN - - UPI PIN बदलण्यासाठी सर्वात आधी WhatsApp ओपन करुन उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. - आता Payment ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्यानंतर बँक अकाउंट सिलेक्ट करा. - यावर क्लिक केल्यानंतर Change UPI PIN आणि Forget UPI PIN असे पर्याय येतील. - जर पीन विसरला असाल, तर Forget UPI PIN वर क्लिक करा. - आता Continue वर क्लिक करा. इथे डेबिट कार्डचे शेवटचे 6 नंबर आणि एक्सपायरी डेट टाका. काही वेळेला CVV देखील टाकावा लागू शकतो. - आता नवा पीन सेट करा. - जर तुम्ही Change UPI PIN सिलेक्ट करत असाल, तर नवा पीन टाकावा लागेल. नवा PIN टाकून Confirm वर क्लिक करा.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Google, Tech news, Upi, Whatsapp News, Whatsapp pay

  पुढील बातम्या