नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : WhatsApp लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग App आहे. WhatsApp सतत आपल्या App मध्ये नवे अपडेट्स देत असतं. सध्या WhatsApp च्या स्टीकर्स फीचरची (WhatsApp Stickers) अतिशय क्रेझ आहे. आता लेटेस्ट अपडेटमध्ये या फीचरमध्ये काही बदल झाले आहेत.
WhatsApp ने काही वर्षांपूर्वी आपल्या प्लॅटफॉर्मवर स्टिकर्स फीचर आणलं होतं. यात युजर्स थर्ड पार्टी अॅप्सच्या (third party apps) मदतीने त्यांचे स्वतःचे व्हॉट्सअॅप स्टिकर्स तयार करून ते त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबातल्या सदस्यांना पाठवू शकत होते. युजर्सना त्यांच्या स्वत: च्या मर्जीनुसार स्टिकर्स कस्टमाइज (customize the stickers) करणं खूप मजेदार आहे. आता WhatsApp च्या लेटेस्ट अपडेटमध्ये युजरला त्याच्या कोणत्याही फोटोला व्हॉट्सअॅप स्टिकरमध्ये बदलण्याची सुविधा मिळाली आहे. तुम्ही नवीन फीचरच्या मदतीने कोणताही फोटो व्हॉट्सअॅप स्टिकरमध्ये बदलू शकता. हे फीचर सध्या केवळ व्हॉट्सअॅप वेबवर (WhatsApp Web) उपलब्ध आहे.
व्हॉट्सअॅप वेबमध्ये कस्टम स्टिकर्स तयार करणं सोपं होण्यासाठी हे नवीन स्टिकर फीचर अॅड करण्यात आलं आहे. तुम्हाला वाढदिवसासारख्या कोणत्याही विशेष प्रसंगी वैयक्तिक व्हॉट्सअॅप स्टिकर बनवायचे असतील, तर या नव्या अपडेटद्वारे सहजपणे बनवू शकता.
- सर्वात आधी व्हॉट्सअॅप वेबवर लॉगइन करा. त्यासाठी डेस्कटॉपवर WhatsApp Web ओपन करा.
- आता फोनच्या व्हॉट्सअॅपवर जाऊन तेथून डेस्कटॉपवर येणारा QR कोड स्कॅन करा.
- QR कोड स्कॅन करण्यासाठी, अॅपच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा आणि Linked Devices वर क्लिक करा.
- त्यानंतर वेबवर तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट ओपन होईल.
- मग कोणतीही चॅट विंडो उघडा.
- आता स्क्रीनच्या तळाशी असलेल्या Attachment आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर Stickers वर क्लिक करा.
- इथे File Explorer Window वर जा आणि तुम्हाला स्टिकरमध्ये रूपांतरित करायचा असलेला कोणताही फोटो निवडा.
- त्यानंतर तुम्हाला वाटेल तसा फोटो अॅडजस्ट करा आणि 'सेंड'वर टॅप करून फोटो पाठवा.
व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सना अॅप वापरताना चांगला अनुभव यावा, यासाठी सतत काम करत आहे. व्हॉट्सअॅपच्या या सुविधेमुळे युजर्सना व्हॉट्सअॅप स्टिकर बनवणं अधिक सोयीस्कर आणि मजेशीर होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, WhatsApp chats, Whatsapp New Feature, WhatsApp user