मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp वर Video Status असं करा डाउनलोड; पाहा प्रोसेस

WhatsApp वर Video Status असं करा डाउनलोड; पाहा प्रोसेस

WhatsApp स्टेटसला व्हिडीओ असल्यास तो सहजपणे डाउनलोड करता येत नाही. पण आता एक ट्रिकद्वारे व्हिडीओ स्टेटस डाउनलोड करता येऊ शकतं.

WhatsApp स्टेटसला व्हिडीओ असल्यास तो सहजपणे डाउनलोड करता येत नाही. पण आता एक ट्रिकद्वारे व्हिडीओ स्टेटस डाउनलोड करता येऊ शकतं.

WhatsApp स्टेटसला व्हिडीओ असल्यास तो सहजपणे डाउनलोड करता येत नाही. पण आता एक ट्रिकद्वारे व्हिडीओ स्टेटस डाउनलोड करता येऊ शकतं.

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : व्हॉट्सअ‍ॅप सर्वाधिक वापर होणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर (how to save whatsapp status on android) मेसेजिंगच्या सुविधेबरोबर आता फोटो, व्हिडीओ, ऑडिओ, फाइल्स अशा अनेक गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवर करता येत असल्याने या App चा वापर करणारा मोठा वर्ग आहे.

अनेकजण WhatsApp वर स्टेटस अपलोड करत असतात. स्टेटसला फोटो ठेवला असल्यास तो स्क्रिनशॉटद्वारे सहज सेव्ह करता येऊ शकतो. परंतु स्टेटसला व्हिडीओ असल्यास तो सहजपणे डाउनलोड करता येत नाही. पण आता एक ट्रिकद्वारे व्हिडीओ स्टेटस डाउनलोड करता येऊ शकतं.

WhatsApp कडून यूजर्सना मिळणार Surprise; App मध्ये होणार मोठे बदल; जाणून घ्या

Files by Google चा वापर करून स्टेटस करा डाउनलोड -

सर्वात आधी Play Store वरून Google फाइल्स डाउनलोड करायला हवं. त्यानंतर स्क्रिनवरील उजव्या बाजूला असलेल्या Menu वर क्लिक करून सेटिंगमध्ये जा. त्यानंतर Show Hidden Files च्या ऑप्शनवर क्लिक करा. आता फाइल मॅनेजर-व्हॉट्सअ‍ॅप-मीडिया-स्टेटसवर नेविगेट करा. त्यानंतर युजरला व्हॉट्सअ‍ॅपवर पाहिलेल्या सर्व स्टेटसची फाईल मिळेल. त्यातलं जे स्टेटस युजरला सेव्ह करायचं आहे ते सिलेक्ट करून डाउनलोड करता येईल.

WiFi चा स्पीड स्लो झालाय? या ट्रिक्सने करा Boost, नेट होईल सुपरफास्ट

स्टेटस सेव्हरचा वापर करून असं डाउनलोड करा स्टेटस -

गूगल प्ले स्टोर वरून स्टेटस सेव्हर डाउनलोड करा. ते ओपन केल्यानंतर ज्या फोटो किंवा व्हिडीओला डाउनलोड करायचं आहे त्याला सेलेक्ट करा. त्यानंतर ते स्टेटस स्मार्टफोनमधील इंटरनल स्टोरेजमध्ये सेव्ह होतील.

काही मिनिटात चार्ज होणार Realme चा हा स्मार्टफोन; लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या

महत्त्वाची बाब म्हणजे युजर ज्या अ‍ॅपचा वापर स्टेटस डाउनलोड करण्यासाठी करत असेल, तर ते अ‍ॅप विश्वसनीय असणं गरजेचं आहे. थर्ड पार्टी App असल्यास अशा Apps ला कोणत्याही प्रकारची परमिशन देऊ नये. त्यामुळे डेटा आणि प्रायव्हसीला धोका निर्माण होऊ शकतो.

First published:
top videos

    Tags: Whatsapp alert, WhatsApp features, Whatsapp New Feature