जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / OLX, ऑनलाइन शॉपिंग साइटवर UPI Payment करताना सतर्क राहा, या फ्रॉड ट्रिक्सपासून सावधान

OLX, ऑनलाइन शॉपिंग साइटवर UPI Payment करताना सतर्क राहा, या फ्रॉड ट्रिक्सपासून सावधान

ऑनलाईन पेमेंट दिसायला जितकं सोपं आहे, तितकंच धोकादायकही ठरू शकतं.

ऑनलाईन पेमेंट दिसायला जितकं सोपं आहे, तितकंच धोकादायकही ठरू शकतं.

हॅकर्स, फ्रॉडस्टर्स विविध मार्गांनी, वेगवेगळ्या पद्धतींनी युजर्सची फसवणूक करतात. त्यामुळे ऑनलाइन पेमेंट करताना, क्यू आर कोड स्कॅन करताना सतर्क राहणं गरजेचं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 3 जानेवारी : देशात वाढत्या डिजीटल ट्रान्झेक्शनसह UPI Payments मध्ये मोठी वाढ झाली आहे. ऑनलाइन पेमेंटमुळे मोठा फायदा झाला असला, तरी वाढत्या ट्रान्झेक्शनसह फ्रॉडचा धोकाही वाढला आहे. UPI च्या नावाने अनेक फ्रॉड, फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. हॅकर्स, फ्रॉडस्टर्स विविध मार्गांनी, वेगवेगळ्या पद्धतींनी युजर्सची फसवणूक करतात. त्यामुळे ऑनलाइन पेमेंट करताना, क्यू आर कोड स्कॅन करताना सतर्क राहणं गरजेचं आहे. वेगवेगळे आमिष दाखवून युजर्सच्या अकाउंटमधून पैशांची चोरी केली जात आहे. UPI Payment करताना सावध राहा. बक्षिस, कॅशबॅकच्या नावाने UPI कलेक्ट रिक्वेस्ट पाठवून पेमेंट करण्याची बाब समोर आल्यास सतर्क व्हा. OLX सारख्या इतर कोणत्याही ऑनलाइन शॉपिंग साइटवरुन वस्तू खरेदी-विक्री करताना, UPI पेमेंट करताना सावध राहा. फ्रॉडस्टर्स काही ट्रिक्सचा वापर करुन तुम्हाला फसवू शकतात.

तुमच्या नावावरही लिमिटपेक्षा जास्त सिमकार्ड आहेत? एका क्लिकवर डिटेल चेक करा

- तुमचं अकाउंट सुरक्षित ठेवण्याच्या नावाने किंवा फ्रॉड पासून बचाव होण्यासाठी नावाखाली OTP मागून फ्रॉड केला जातो. त्यामुळे तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी इतरांसोबत शेअर करू नका. - बक्षिसं, कॅशबॅक, लॉटरीच्या नावाने कॉल करुन UPI ID आणि PIN डिटेल्स मागून फ्रॉड केला जातो. त्यामुळे तुमची कोणतीही माहिती कोणाशीही शेअर करू नका. - सिम कार्ड रजिस्ट्रेशनच्या नावानेही फ्रॉड केला जातो. किंवा तुमचं सिम ब्लॉक होण्याच्या नावाखाली फसवणूक केली जाते. - मोबाइलवर क्रेडिट लिमिट अपग्रेडच्या नावाने SMS द्वारे डिटेल्स मागितले जातात. त्यामुळे अशा गोष्टींना बळी पडू नका.

तुम्हीही Paytm चा वापर करता का? पेटीएमच्या फेक App द्वारे होतोय Online Fraud

- तुमची खासगी माहिती, बँक डिटेल्स, मोबाइल ओटीपी, पासवर्ड्स इतरांशी शेअर करू नका. WhatsApp किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया साइटवरुन कोणी पैशांची मागणी केल्यास संबंधित व्यक्तीला कॉल करुन खात्री करुन घ्या. त्यानंतरच पुढील पावलं उचला. अन्यथा एका चुकीमुळे संपूर्ण बँक अकाउंट रिकामं होऊ शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात