Home /News /money /

आता इंटरनेटशिवाय 200 रुपयांचं पेमेंट करता येईल पण...; Offline digital payment बाबत RBI चा नवा नियम

आता इंटरनेटशिवाय 200 रुपयांचं पेमेंट करता येईल पण...; Offline digital payment बाबत RBI चा नवा नियम

Offline digital payments : रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमानुसार एका वेळी 200 रुपये आणि एकूण 2000 रुपयांचं ऑफलाइन डिजीटल ट्रान्झॅक्शन करता येईल.

    मुंबई, 03 जानेवारी : हल्ली डिजीटल पेमेंट (Digital payment) बऱ्याच प्रमाणात वाढलं आहे. आता डिजीटल पेमेंट म्हटलं की त्यासाठी इंटरनेट हा हवाच. इंटरनेटशिवाय ऑनलाइन पेमेंट (Online payment) शक्यच नाही. पण आता तुम्हाला इंटरनेटशिवायही असं पेमेंट करता येणार आहे. ऑफलाइन डिजीटल पेमेंटबाबत (Offline digital payment) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नवा नियम जारी केला आहे. इंटरनेटशिवायही पेमेंट करता यावं यासाठी रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षीच हालचाली सुरू केल्या होत्या.  गेल्या वर्षी 6 ऑगस्ट, 2021 रोजी रिझर्व्ह बँकेने ऑफलाइन मोडमध्ये डिजीटल पेमेंटसंबंधित एका प्राथमिक योजनेला मंजुरी दिली होती. ज्यात ऑफलाइन किंवा इंटरनेटशिवाय डिजीटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन पावलं उचलली जात आहेत. छोट्या रकमेच्या डिजीटल ट्रान्झॅक्शनसाठी हे प्रयत्न करण्यात आले. सप्टेंबर 2020 ते जुलै 2021 दरम्यान काही आर्थिक कामात याची प्राथमिक चाचणीही करण्यात आली. हे वाचा - सावधान! महिलांना त्रास देणाऱ्यावर आता ड्रोनचा वॉच; अवघ्या 4 मिनिटांतच मिळणार मदत याच योजनेचा भाग म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोमवारी ऑफलाइन पेमेंट ट्रान्झॅक्शनाबत नवीन नियम जारी केला आहे. नव्या नियमानुसार एखादी व्यक्ती आता जास्तीत जास्त 200 रुपयांचंच ऑफलाइन पेमेंट करू शकते. ऑफलाइन पेमेंटची एकूण मर्यादा 2000 रुपये ठेवण्यात आली आहे.  म्हणजे एका एका वेळी 200 रुपये आणि एकूण 2000 रुपयांचं ऑफलाइ डिजीटल ट्रान्झॅक्शन करता येईल. पण  हे पेमेंट फेस-टू-फेस म्हणजे समोरासमोरच होईल. हे वाचा - OLX, ऑनलाइन शॉपिंग साइटवर UPI Payment करताना Alert, या फ्रॉड ट्रिक्सपासून सावधान आरबीआयने सांगितलं,  पैशांची देवाणघेवाण करणाऱ्या दोन्ही व्यक्ती समोरासमोर असाव्यात.  कोणत्याही मशीनवर ऑफलाइन पेमेंट तेव्हाच होईल जेव्हा ग्राहक त्याला परवानगी देईल. यासाठी ग्राहक कार्ड, मोबाईल वॉलेड किंवा मोबाईल डिव्हाइसचा वापर करू शकतो. ऑफलाइन पेमेंटसंबंधी नवे नियम आणि सूचनांचं ऑथराइज्ड पेमेंट सिस्टम ऑपरेटर आणि पेमेंट सिस्टम पार्टीसिपेन्ट्स  यांनी पालन करणं गरजेचं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Money, Online payments, Rbi

    पुढील बातम्या