Home /News /technology /

मुलांच्या COVID-19 लसीकरणासाठी कसा कराल स्लॉट बुक, पाहा सोपी प्रोसेस

मुलांच्या COVID-19 लसीकरणासाठी कसा कराल स्लॉट बुक, पाहा सोपी प्रोसेस

प्रौढांच्या लसीकरणाप्रमाणेच मुलांसाठी आरोग्य सेतू (Aarogya Setu) आणि उमंग अ‍ॅपशी संलग्न असलेल्या कोविन पोर्टलवर नोंदणी करता येईल.

नवी दिल्ली, 3 जानेवारी : नव्या वर्षात देशातील पालक आणि मुलांसाठी चांगली बातमी आहे. देशभरातील 15 ते 18 वयोगटातील मुलांना आता कोविड 19 (COVID 19) प्रतिबंधक लस घेता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुलांना भारत बायोटेकचं कोवॅक्सीन आणि झायडस कॅडिलाची लस मिळणार आहे. सध्या लसीकरणासाठी केवळ कोवॅक्सीन उपलब्ध आहे. लसीकरणासाठीची नोंदणी प्रक्रिया 1 जानेवारीपासून सुरू झाली असून 3 जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात होईल. प्रौढांच्या लसीकरणाप्रमाणेच मुलांसाठी आरोग्य सेतू (Aarogya Setu) आणि उमंग अ‍ॅपशी संलग्न असलेल्या कोविन पोर्टलवर नोंदणी करता येईल. युवा स्वतः ऑनलाईन नोंदणी करू शकतात किंवा त्यांचे पालकही आधीच नोंदणीकृत असल्याने पाल्यांना लाभार्थी म्हणून त्यांची नोंदणी करू शकतात. तसंच युवा आधारकार्डशिवाय त्यांच्या विद्यार्थी ओळखपत्राचा वापर करूनही नोंदणी करू शकतात. तुम्ही कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी (COVID-19 vaccine) आरोग्य सेतू अ‍ॅपवर खालील पद्धतीने नोंदणी करू शकता.

तुमच्या नावावरही लिमिटपेक्षा जास्त सिमकार्ड आहेत? एका क्लिकवर डिटेल चेक करा

- सर्वात आधी अ‍ॅप ओपन करा आणि त्यावर उजव्या बाजूला असलेला कोविन (CoWIN) पर्याय निवडा. - लसीसाठी नोंदणी किंवा लॉगइन (Login / Registration) पर्याय निवडा आणि मोबाइल क्रमांकाने लॉगइन करा. - तुम्ही जर नवीन युजर असाल, तर तुम्ही स्लॉट बुक करू शकता किंवा लाभार्थी म्हणून स्वतःला नोंदवू शकता. - तुमची माहिती त्यात भरा. फोटो आयडीसाठी (Photo ID) यासाठी विद्यार्थी ओळखपत्रही वापरू शकता, फोटो आयडी नंबर आणि फोटो आयडीवरील नावाप्रमाणे लाभार्थी म्हणून नोंदवू शकता. - लिंग आणि जन्म वर्ष याबाबत माहिती भरा. - एकदा ही माहिती भरल्यानंतर तुम्ही पुन्हा लाभार्थी पर्याय असलेल्या पेजवर पोहोचाल. तेथील नव्या लाभार्थीच्या नावाच्या बाजूला असलेलं कॅलेंडरचं चिन्ह निवडा. - तिथे तुमचा पिनकोड आणि तारीख टाका. युजर मोफत किंवा पैसे भरून या पर्यायानुसार लसीकरणासाठी केंद्र निवडू शकतात. - एकदा केंद्र निवडल्यावर तुम्हाला त्यानुसार अ‍ॅपवर उपलब्धता आणि तारीख दिसेल.

WhatsAppचा युजर्सना झटका! 17 लाखांपेक्षा जास्त भारतीयांचं अकाउंट केलं ब्लॉक

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार ज्यांचं जन्मवर्ष 2007 किंवा त्याच्या आधीचं आहे, तेच लसीकरणासाठी पात्र आहेत. द ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने दिलेल्या परवानगीनुसार ईयूएने 12 वर्षांवरील मुलांसाठी काही अटींनुसार स्वदेशी विकसित को-वॅक्सीन तयार केलं आहे. परंतु याबाबत अजून अधिक तपशील देण्यात आलेला नाही.
First published:

Tags: Corona vaccination, Corona virus in india

पुढील बातम्या