जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / IRCTC द्वारे बुक करा तात्काळ तिकीट, या सोप्या ट्रिकने मिळेल कन्फर्म Ticket

IRCTC द्वारे बुक करा तात्काळ तिकीट, या सोप्या ट्रिकने मिळेल कन्फर्म Ticket

IRCTC द्वारे बुक करा तात्काळ तिकीट, या सोप्या ट्रिकने मिळेल कन्फर्म Ticket

तात्काळ तिकीट काही वेळातच संपत असल्याने अनेकांना कन्फर्म सीट न मिळाल्याची समस्या येते. परंतु काही टिप्स फॉलो करुन तुम्ही तात्काळ तिकीट बुक करू शकता आणि कन्फर्म तिकीटही मिळवू शकता.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 जानेवारी : ट्रेन तिकीट (Train Ticket) बुक करण्यासाठी IRCTC वेबसाइट किंवा App अतिशय फायदेशीर ठरतं. परंतु तात्काळ तिकीट बुक (Tatkal Ticket Booking) करण्यासाठी अनेकदा समस्या येते. तात्काळ तिकीट काही वेळातच संपत असल्याने अनेकांना कन्फर्म सीट न मिळाल्याची समस्या येते. परंतु काही टिप्स फॉलो करुन तुम्ही तात्काळ तिकीट बुक करू शकता आणि कन्फर्म तिकीटही मिळवू शकता. आयआरसीटीसी कडून (IRCTC) तिकीट बुक करण्यासाठी IRCTC वर तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे. अकाउंट असल्यास पुढील स्टेप्स फॉलो करू शकता. तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी IRCTC वेबसाइटऐवजी IRCTC App चा वापर करा. IRCTC App गुगल प्ले स्टोर (Google Play Store) किंवा अॅप स्टोरवरुन (App Store) डाउनलोड करू शकता.

हे वाचा -  Alert!बँकेतही सुरक्षित नाही तुमचा पैसा;सर्व्हेतून धक्कादायक खुलासा,काय आहे कारण

- IRCTC App डाउनलोड केल्यानंतर लॉगइन करा. - लॉगइन झाल्यानंतर App खाली My Account ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. - त्यानंतर My Master List ऑप्शन सिलेक्ट करा. - इथे टॉपला डाव्या बाजूला Add Passenger ऑप्शनवर क्लिक करा आणि सर्व पॅसेंजर्सची नावं Add करा, ज्यांचं तिकीट बुक करायचं आहे.

हे वाचा -  PF Balance: या 4 सोप्या पद्धतींनी तपासता येईल पीएफ बॅलेन्स, पाहा प्रोसेस

तात्काळ तिकीट बुकिंग AC कोचसाठी सकाळी 10 वाजल्यापासून आणि नॉन-एसीसाठी 11 वाजल्यापासून सुरू होतं. तात्काळ तिकीट बुक करताना दोन ते तीन मिनिटं आधीच App मध्ये लॉगइन करा. त्यानंतर स्टेशन, डेट आणि ट्रेन सिलेक्ट करा. टाइम सुरू झाल्यानंतर लगेच तिकीट बुक करा. जिथे तुम्हाला पॅसेंजर डिटेल्स टाकायचे आहेत, तिथे तुम्ही Add Existing ऑप्शनवर क्लिक करुन My Master List मध्ये पॅसेंजर Add करू शकता. यामुळे वेळेची बचत होईल. त्यानंतर पेमेंटवेळी UPI चा वापर करुन आणखी वेळ वाचेल आणि कन्फर्म तात्काळ तिकीट बुक करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात