नवी दिल्ली, 15 जानेवारी : जर तुम्हीही नोकरदार असाल, तर तुमचं Employees’ Provident Fund Organisation मध्ये अकाउंट असेल, ज्यात तुमच्या वेतनातील काही हिस्सा जमा होतो. नोकरदार वर्गासाठी PF चा पैसा त्यांच्या आयुष्यभराची कमाई असते. EPFO चे सदस्य घरबसल्या आपला पीएफ बॅलेन्स तपासू शकता.
मिस्ड कॉल -
तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन PF Balance तपासू शकता. त्यानंतर EPFO कडून मेसेज येईल. या मेसेजमध्ये पीएफ खात्याचे डिटेल्स मिळतील.
एसएमएस -
तुमचा UAN नंबर EPFO कडे रजिस्टर्ड असेल, तर तुमच्या कॉन्ट्रिब्यूशन आणि पीएफ बॅलेन्सची माहिती मेसेजद्वारे मिळू शकते. त्यासाठी 7738299899 वर EPFOHO UAN ENG लिहून पाठवावं लागेल. शेवटची तीन अक्षरं भाषेसाठी आहेत. हिंदीमध्ये माहिती हवी असल्यास EPFOHO UAN HIN लिहून पाठवू शकता. हा SMS UAN रजिस्टर्ड मोबाइल नंबरद्वारे पाठवावा लागेल.
वेबसाइट -
- EPFO वेबसाइट वर जा.
- इथे Employee Centric Services वर क्लिक करा.
- आता View Passbook वर क्लिक करा.
- पासबुक पाहण्यासाठी UAN द्वारे लॉगइन करा.
UMANG App -
- UMANG App ओपन करा आणि EPFO वर क्लिक करा.
- आता Employee Centric Services वर क्लिक करा.
- इथे View Passbook वर क्लिक करा.
- UAN नंबर आणि OTP टाका.
- रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर OTP येईल.
- OTP टाकल्यानंतर पीएफ बॅलेन्स तपासू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Epfo news, PF Amount, PF Withdrawal