Home /News /technology /

Google ची तुमच्या प्रत्येक Search वर नजर, असं ठेवता येईल सुरक्षित

Google ची तुमच्या प्रत्येक Search वर नजर, असं ठेवता येईल सुरक्षित

Google कडून लोकेशनचा वापर आपली सर्विस आणखी चांगली करण्यासाठी केला जातो. परंतु गुगल तुमचं लोकेशन ट्रॅक करू नये, यासाठी काही टिप्सद्वारे त्याला ब्लॉक करता येऊ शकतं.

  नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : Google चा वापर जगातील प्रत्येक भागात होतो. प्रत्येक युजरच्या प्रत्येक सर्चवर, क्लिकवर Google ची नजर असते. कोणत्या साइटवर युजर काय सर्च करतो, हे गुगलला समजतं. Google कडून लोकेशनचा वापर आपली सर्विस आणखी चांगली करण्यासाठी केला जातो. परंतु गुगल तुमचं लोकेशन ट्रॅक करू नये, यासाठी काही टिप्सद्वारे त्याला ब्लॉक करता येऊ शकतं. लोकेशन ट्रॅकिंग कसं कराल बंद? Location Tracking बंद करण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिल्या पर्यायात तुमच्या डिव्हाईसमध्ये असलेल्या सर्व Apps ची लोकेशन डेटा परमिशन ब्लॉक होईल. - Android स्मार्टफोनमध्ये Settings मध्ये जा. - त्यानंतर Location वर क्लिक करा. - लोकेशन परमिशन डाव्या बाजूला स्वाइप केल्यानंतर टर्न ऑफ होईल. अशाप्रकारे लोकेशन परमिशन टर्न ऑनही करता येते. त्याशिवाय Google Account च्या लोकेशन हिस्ट्री फीचरला टर्न ऑफ केल्यानंतरही लोकेशन ट्रॅकिंग बंद करता येतं. त्यामुळे सर्व Google Apps आणि सर्विस सिंगल स्वाइपने बंद करता येतं.

  OK Google बोलल्यानंतर कंपनीचे कर्मचारी ऐकतात तुमचं बोलणं, गुगलचा मोठा खुलासा

  Google Account लोकेशन ट्रॅकिंग - - Google Account च्या Settings वर क्लिक करा. - त्यानंतर Manage your Google account वर क्लिक करा. - आता Privacy आणि Personalization वर क्लिक करा. - इथे Activity Control Section च्या Location History वर क्लिक करावं लागेल. - त्यानंतर डाव्या बाजूला स्वाइप करुन Location History बंद करा.

  Google Drive वर चुकूनही स्टोर करू नका या गोष्टी; होईल कारवाई, कंपनीकडून इशारा

  दरम्यान, तुम्ही गुगलवर काय सर्च केलं हे कोणालााही समजू नये यासाठी तुम्ही गुगल सर्च हिस्ट्रीला (Google Search History) पासवर्ड (Password) ठेऊ शकता. - यासाठी सर्वात आधी आपल्या वेब ब्राउजरवर activity.google.com ओपन करा. यावेळी तुमचं गुगल अकाउंट Signed In असणं गरजेचं आहे. - त्यानंतर Manage My Activity Verification वर क्लिक करा. इथे Require Extra Verification सिलेक्ट करा आणि Save वर क्लिक करा. - नंतर युजरला आपला गुगल अकाउंट पासवर्ड टाकावा लागेल. त्यानंतर Google Search History पासवर्डने प्रोटेक्टेड होईल.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Google, Tech news

  पुढील बातम्या