• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • डेस्कटॉपसाठी Google Search वर आलं डार्क मोड; कसा कराल वापर?

डेस्कटॉपसाठी Google Search वर आलं डार्क मोड; कसा कराल वापर?

गुगल (google) आपल्या प्लॅटफॉर्मला अधिक शानदार बनवण्यासाठी नवनवीन फीचर्स आणत असते. आता कंपनीने आपल्या सर्च पेजवर (google search page) डार्क मोड (dark mode) हे फीचर आणले आहे.

  • Share this:
  मुंबई, 24 सप्टेंबर-  गुगल (google) आपल्या प्लॅटफॉर्मला अधिक शानदार बनवण्यासाठी नवनवीन फीचर्स आणत असते. आता कंपनीने आपल्या सर्च पेजवर (google search page) डार्क मोड (dark mode) हे फीचर आणले आहे. कंपनीने वेबवर डेस्कटॉपसाठी हे फीचर लाँच केले आहे. या फीचरची गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये टेस्टिंग सुरु करण्यात आलं होतं. गुगलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सर्च पेजसाठी डार्क मोड फीचर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. डार्क थीम गुगल होमपेज, सर्च रिझल्ट पेज आणि सर्च सेटिंग्ससाठी लागू होईल. हे फीचर एनेबल केल्यानंतर यूजर्सला वेब ब्लॅक रंगात दिसेल. हे फीचर डेस्कटॉपसाठी लाँच करण्यासाठी गुगलने गेल्या वर्षीच डिसेंबरमध्ये टेस्टिंग सुरू केलं होतं. मोबाईलवर गुगल सर्चसाठी हे फीचर आधीच उपलब्ध आहे. त्यानंतर डेस्कटॉपवर हे फीचर सुरू होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. (हे वाचा:'Android'फोन युजर्ससाठी 'हे' सिक्रेट कोड आहेत महत्त्वाचे; अन्यथा बसेल मोठा फटका) डार्क मोड थीम अंतर्गत यूजर्सला ॲपियरन्स (Appearance) सेटिंग्समध्ये तीन पर्याय निवडता येतील. पहिला पर्याय म्हणजे गुगल सर्चचं ॲपियरन्स सेटिंग्स ही कॉम्प्युटरच्या डिफॉल्ट थीमसोबत सिंक (sync) करता येऊ शकते. तर, दुसऱ्या पर्यायात डार्क बॅकग्राऊंडसाठी लाइट टेक्स्ट सिलेक्ट करता येईल. तिसऱ्या पर्यायामध्ये लाइट मोड आहे, म्हणजे लाइट बॅकग्राउंडमध्ये डार्क टेक्स्ट, जी डिफॉल्ट थीम असेल. डार्क मोड ऑपरेटिंग सिस्टिम अथवा अ‍ॅप्लिकेशनचा रंग बदलून काळा करते. डार्क मोड ऑन केल्याने फोनच्या बॅटरीची बचत होत असते. मोबाइलचा ब्राइटनेस जास्त असल्यावर डोळ्यांना जास्त वेळ स्क्रिन पाहताना त्रास होतो. डार्क मोडमुळे हा धोका कमी होतो. त्यातच आता गुगल सर्च पेजसाठी डार्क थीम डेस्कटॉपवर उपलब्ध झाली आहे. डार्क मोड थीम अंतर्गत यूजर्सला डार्क, लाइट आणि डिव्हाइस डिफॉल्ट असे तीन कलर पर्याय मिळणार आहेत. ही सुविधा मोबाईलवर गुगल पेज सर्चसाठी यापूर्वीच उपलब्ध होती. ती आता डेस्कटॉपवर आल्यामुळे युजर्सची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली आहे. (हे वाचा:Poco C4 स्मार्टफोन भारतात या तारखेला होणार लॉन्च; पाहा डिटेल्स) डेस्कटॉपवर गुगल सर्च डार्क मोड कसा अ‍ॅक्टिव्हेट कराल ? - सर्वांत प्रथम कोणत्याही वेब ब्राउजरमध्ये गुगल सर्च ओपन करा. - उजव्या बाजूला वर सेटिंग्जचा पर्याय असेल. त्यावर क्लिक करा. - सेटिंग्जमध्ये गेल्यावर डाव्या बाजूला Appearance पर्यायावर क्लिक करा. - येथे Device default, Dark आणि Light हे तीन ऑप्शन दिसतील, त्यापैकी कोणतेही एक ऑप्शन सिलेक्ट करा - सर्वात शेवटी Save हा ऑप्शन असेल, त्यावर क्लिक करा.
First published: