• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • Facebook अकाउंट होईल हॅक, तुमच्या फोनमधून लगेच डिलीट करा हे Apps

Facebook अकाउंट होईल हॅक, तुमच्या फोनमधून लगेच डिलीट करा हे Apps

  • Share this:
    नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : कोरोना काळात ऑनलाईन फ्रॉडच्या (Onlıne Fraud) संख्येत मोठी वाढ झाली आहे. हॅकिंगचे (Hacking) प्रकारही वाढले आहेत. आता रिसर्चर्सने एक नवा अँड्रॉईड ट्रोजन फ्लायट्रॅप व्हायरस (Flytrap) स्पॉट केला आहे. हा व्हायरस 140 हून अधिक देशांमध्ये फेसबुक युजर्सचं अकाउंट हॅक (Facebook Account Hack) करत आहे. Zimperium zLabs मोबाईल थ्रेट रिसर्च टीमने दिलेल्या माहितीनुसार, 2021 मार्चपासून मालवेअर गुगल प्ले स्टोरचे (Google Play Store) मॅलिशिअस अ‍ॅप, थर्ड पार्टी अ‍ॅप स्टोर आणि साइडलोडेड अ‍ॅप्सद्वारे पसरले आहेत. हा मालवेअर अतिशय सोप्या ट्रिकवर काम करतो. हा मालवेअर मॅलिशिअस अ‍ॅपमध्ये युजरच्या Facebook क्रेडेंशिअलद्वारे लॉगइन करायला सांगतो आणि त्यानंतर युजरचा डेटा चोरी केला जातो. रिसर्चर्सने दिलेल्या माहितीनुसार, फ्लायट्रॅप व्हायरस वेगवेगळ्या मोबाईल अ‍ॅप्स नेटफ्लिक्स कूपन कोड, गुगल अ‍ॅडवर्ल्ड कूपन कोड आणि बेस्ट फुटबॉल टीम वोटिंग आणि प्लेअरच्या नावाचा वापर करतो. हे अ‍ॅप्स डाउनलोड झाल्यानंतर युजर्सला अनेक प्रश्न विचारले जातात आणि त्याद्वारे फसवणूक केली जाते. यात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर युजरला फेसबुकला लॉगइन पेजवर डायरेक्ट केलं जातं. यात वोट देण्यासाठी फेसबुक अकाउंट लॉगइन करण्यासाठी सांगितलं जातं. मालवेअर जावास्क्रिप्ट इंजेक्शनचा वापर करतो, ज्यात युजरचा फेसबुक ID, लोकेशन, ईमेल अ‍ॅड्रेस आणि IP अ‍ॅड्रेस अ‍ॅक्सेस केला जातो. चोरी केलेला डेटा Flytrap कमांड आणि कंट्रोल सर्व्हरवर ट्रान्सफर केला जातो.

    कोणी तुमचं Facebook Account लॉगइन तर केलं नाही ना?असं तपासून करा हे सुरक्षित बदल

    >>GG Voucher (com.luxcarad.cardid) >>Vote European Football (com.gardenguides.plantingfree) >>GG Coupon Ads (com.free_coupon.gg_free_coupon) >>GG Voucher Ads (com.m_application.app_moi_6) >>GG Voucher (com.free.voucher) >>Chatfuel (com.ynsuper.chatfuel) >>Net Coupon (com.free_coupon.net_coupon) >>Net Coupon (com.movie.net_coupon) >>EURO 2021 Official (com.euro2021) Zimperium zLabs मोबाईल थ्रेट रिसर्च टीमने गुगलला धोकादायक अ‍ॅप्सबाबत इशारा दिला आहे, जे गुगल प्ले स्टोरद्वारे फ्लायट्रॅप मालवेअर ट्रान्सफर करत आहे. आता गुगलने रिसर्च आणि वेरिफाय करुन मॅलिशिअस अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवरुन हटवले आहेत.
    Published by:Karishma
    First published: