जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / कोणी तुमचं Facebook Account लॉगइन तर केलं नाही ना? असं तपासून करा 'हे' सुरक्षित बदल

कोणी तुमचं Facebook Account लॉगइन तर केलं नाही ना? असं तपासून करा 'हे' सुरक्षित बदल

कोणी तुमचं Facebook Account लॉगइन तर केलं नाही ना? असं तपासून करा 'हे' सुरक्षित बदल

एखादा तुमच्या फेसबुक अकाउंटमध्ये लॉगइन करुन त्याचा वापर करत असेल, तर त्या व्यक्तीला तुम्ही रिमूव्ह करू शकता आणि अकाउंट सिक्योर करू शकता.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट : इंटरनेटचा (Internet) वापर जितका उपयोगी आहे, तितका तो धोकादायकही आहे. सध्या ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud), सायबर क्राईमच्या (Cyber Crime) संख्येत मोठी वाढ झाली आहे. फ्रॉडस्टर्स विविध पद्धतींनी युजर्सची फसवणूक करत आहेत. युजर्सची एक चूक फ्रॉडस्टर्ससाठी मोठी संधी ठरू शकते. त्यामुळे प्रत्येकाने इंटरनेट, सोशल मीडिया मीडियाचा (Social Media) वापर करताना प्रायव्हसीकडे (Social Media Privacy) लक्ष देणं गरजेचं ठरतं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकचा सर्वाधिक वापर केला जातो. त्यामुळे फेसबुक अकाउंट (Facebook Account) सुरक्षित राहणं गरजेचं आहे. एखाद्याने तुमचं अकाउंट लॉगइन करुन ठेवलं असेल, तर अशा परिस्थितीत याची माहिती असणं गरजेचं आहे. एखादा तुमच्या फेसबुक अकाउंटमध्ये लॉगइन करुन चुकीचा वापर करत असेल, तर त्या व्यक्तीला तुम्ही रिमूव्ह करू शकता आणि अकाउंट सिक्योर करू शकता.

तुमचा Facebook डेटा लीक झालाय का? सोप्या ट्रिकद्वारे असं तपासा

- सर्वात आधी फेसबुक अ‍ॅप किंवा डेस्कटॉप वर्जनमध्ये ओपन करावं लागेल. इथे सेटिंगमध्ये जावं लागेल. - सिक्योरिटी आणि लॉगइन पर्यायावर क्लिक करा. - आता Where you are logged in वर क्लिक करावं लागेल.

खोट्या मेलद्वारे अशी होते फसवणूक, Phishing Email नेमका कसा ओळखायचा?

- इथे संपूर्ण अशा डिव्हाईसची लिस्ट दिसेल, जिथे तुमचा फेसबुक युजरनेम आणि पासवर्ड लॉगइन आहे. - यात तुमच्या ओळखीचे नसलेले डिव्हाईस, लॉगइन (Login) हटवा आणि पासवर्ड लगेच बदला. - अकाउंट सिक्योर करण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (Two-Factor Authentication) ऑन करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात