• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • Google वर 5000% पेक्षा जास्त सर्च करण्यात ही गोष्ट, जाणून घ्या काय आहे हा शब्द?

Google वर 5000% पेक्षा जास्त सर्च करण्यात ही गोष्ट, जाणून घ्या काय आहे हा शब्द?

एका शब्दाच्या सर्चमध्ये 5000% पेक्षा जास्त तेजी आढळून आली आहे. त्यामुळे हा शब्द तसा खासंच आहे, जाणून घ्या काय आहे हा शब्द आणि काय आहे त्याची विशेषता

  • Share this:
    नवी दिल्ली, 10 ऑगस्ट: जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला माहित करुन घ्यायची असते तेव्हा शक्यतो Google चा आधार घेतला जातो. गुगल सर्च (Google Search) करुन विविध माहिती मिळवली जाते. काही वेळा काही गोष्टी अनेक लोकांकडून सर्च केल्या जातात, ज्या की सर्चिंग लिस्टमध्ये सर्वात वर (Most Searched on Google) येतात.  ‘ईयर इन सर्च’ रिपोर्टनुसार कोरोना काळात जगरभरात कोरोना व्हायरस या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर होतं. अर्थात युजर्सनी सर्वाधिक वेळा कोरोना व्हायरसबाबत सर्च केलं होतं. मात्र एका शब्दाच्या सर्चमध्ये 5000% पेक्षा जास्त तेजी आढळून आली आहे. त्यामुळे हा शब्द तसा खासंच आहे, जाणून घ्या काय आहे हा शब्द आणि काय आहे त्याची विशेषता देशभरात स्टॉक मार्केटबाबत सध्या औत्सुक्य वाढू लागलं आहे. लोकं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू लागल्यामुळे यासंदर्भातील विविध गोष्टींचा अभ्यास केला जातो. अनेक नवनवीन शब्दांचे अर्थ गुगलवर शोधले जातात. दरम्यान 2020 च्या लॉकडाऊनमध्ये Google वर ‘FAANG स्टॉक’ या शब्दात ब्रेकआउट पाहायला मिळाला. हे वाचा-PF वरील व्याजाच्या पैशासंदर्भात मोठी अपडेट! कधी मिळणार EPFO सदस्यांना पैसे? Google च्या मते ब्रेकआउटचा अर्थ असा आहे की एखादा शब्द 5000 टक्क्यांपेक्षा अधिक वेळा सर्च केला जाणं. FAANG ची प्रसिद्धी इतकी वाढली की जगभरातील खासकरुन आशियातील लोक याबाबत अधिक माहिती करुन घेऊ इच्छित होते. FAANG अमेरिकेतील सर्वात मोठ्या लिस्टेड कंपन्यांनी मिळून बनलेले आहे आणि गुंतवणुकदारांमध्ये सर्वात प्रसिद्ध देखील आहे. काय आहे FAANG? अलीकडेच FAANG stocks विशेष प्रसिद्धी मिळवत आहे.  FAANG stocks चा वापर सर्वात मोठ्या पाच महत्त्वाच्या आणि टॉप कंपन्यांच्या शेअर्सना परिभाषित केला जातो. F – Facebook (फेसबुक) A – Amazon (अॅमेझॉन) A – Apple (अॅप्पल) N – Netflix (नेटफ्लिक्स) G – Google (आता Alphabet Inc.च्या नावाने ओळखलं जातं) हे वाचा-Gold price: 2 दिवसात 1700 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, आज काय आहे सोन्याचा भाव? FAANG शब्दाचा वापर पहिल्यांदा 2013 मध्ये मॅड मनी जिम क्रेमरनी CNBC वरील कार्यक्रमात केला होता. क्रेमरनी सुरुवातीला FANG शब्दाचा वापर केला होता. त्यानंतर Apple ची लोकप्रियता वाढल्यानंतर आणखी एक A यामध्ये जोडला गेला. त्यामुळे FANG चं FAANG झालं. का सर्वाधिक सर्च झाला हा शब्द? गेल्यावर्षी कोरोना काळात अनेक लोकं काम आणि मनोरंजन या गोष्टींसाठी सर्वाधिक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरच अवलंबून होते. या प्लॅटफॉर्म्सच्या लोकप्रियतेतंही वाढ झाली. Amazon Prime, Netflix सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सची मागणी वाढली. गुगल आणि फेसबुकवरही लोकं अधिक वेळ घालवत होते. यानंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी पाहायला मिळाली. या कंपन्यांची लोकप्रियता त्यावेळी पाहायला मिळाली जेव्हा अधिकतर भारतीय ब्रोकिंग फर्म्सनी परदेशीत व्यापारात अधिक सुविधा देण्यास सुरुवात केली. अर्थात ज्या भारतीय गुंतवणुकदारांचे प्रमुख ब्रोकिंग फर्मसह ट्रेडिंग खाते होते, ते अमेरिकन शेअर बाजारात लिस्टेड शेअर खरेदी करू शकत होते. ज्यात FAANG देखील समाविष्ट होते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: