मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

कोट्यवधी युजर्सला Google चा इशारा, Chrome Browser लगेच करा अपडेट अन्यथा...

कोट्यवधी युजर्सला Google चा इशारा, Chrome Browser लगेच करा अपडेट अन्यथा...

Google ने जगभरातील 2 बिलियन अर्थात 200 कोटी क्रोम युजर्सला (Chrome Users) ब्राउजर लगेच (Google Browser Update) अपडेट करण्याचा इशारा दिला आहे.

Google ने जगभरातील 2 बिलियन अर्थात 200 कोटी क्रोम युजर्सला (Chrome Users) ब्राउजर लगेच (Google Browser Update) अपडेट करण्याचा इशारा दिला आहे.

Google ने जगभरातील 2 बिलियन अर्थात 200 कोटी क्रोम युजर्सला (Chrome Users) ब्राउजर लगेच (Google Browser Update) अपडेट करण्याचा इशारा दिला आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 23 जानेवारी : गुगलने (Google) आपल्या युजर्सला इशारा दिला आहे. जगभरातील 2 बिलियन अर्थात 200 कोटी क्रोम युजर्सला (Chrome Users) ब्राउजर लगेच (Google Browser Update) अपडेट करण्याचा इशारा दिला आहे. Google ने Chrome चं नवं अपडेट रिलीज केलं आहे. गुगल क्रोम ब्राउजरच्या मागील वर्जनमध्ये 26 समस्या आढळल्या होत्या. त्यामुळे युजर्सची पर्सनल माहिती सायबर क्रिमिनल्सपर्यंत (Cyber Criminals) पोहोचू शकत होती. त्यामुळे मोठ्या सायबर अटॅकचा (Cyber attack) धोका निर्माण होतो.

गुगलने क्रोम ब्राउजरसाठी (Google Chrome Browser) लेटेस्ट वर्जन 97.0.4692.99 रोल आउट केलं आहे. ज्यात मागील वर्जनमध्ये मिळेलल्या 26 समस्या फिक्स केल्या गेल्या आहेत. गुगल क्रोमचं नवं वर्जन आतापर्यंतचं सर्वात सिक्योर वर्जन आहे. जर तुम्हीही आपल्या स्मार्टफोन, डेस्कटॉप, टॅबलेटमध्ये क्रोमचं जुनं वर्जन वापरत असाल, तर ते लगेच अपडेट करण्याची गरज आहे. काही सोप्या स्टेप्सने तुम्ही Google Chrome अपडेट करू शकता.

हे वाचा - Aadhaar Card संबंधी कोणतीही समस्या एका कॉलवर सोडवली जाईल, या क्रमांकावर करा कॉल

Google Chrome असं करा अपडेट -

जर तुमच्या स्मार्टफोन, डेस्कटॉपमध्ये गुगल क्रोमसाठी ऑटोमॅटिक अपडेट ऑन असेल, तर लवकरच नवं सॉफ्टवेअर वर्जन रिसिव्ह होईल. जर ऑटोमॅटिक अपडेट ऑन केलं नसेल, तर काही स्टेप्स फॉलो करुन ऑन करू शकता.

हे वाचा - व्यक्तीने Loan Appद्वारे घेतलं होतं कर्ज,काही दिवसांत झाला हजारोंचा Online Fraud

- सर्वात आधी Google Chrome च्या सेटिंग मेन्यूमध्ये जा.

- त्यानंतर हेल्प सेक्शनमध्ये जा आणि About Google Chrome वर टॅप करा.

- इथे गुगल क्रोमचं सध्याचं करंट वर्जन दिसेल. इथे 97.0.4692.99 किंवा यावरील वर्जन दिसत असेल, तर तुमचं ब्राउजर लेटेस्ट अपडेटसह अपडेटेड आहे. जर या खालचं वर्जन असेल, तर गुगल क्रोम लगेच अपडेट करावं लागेल.

- त्यासाठी प्ले स्टोअर (Play Store) वर लेटेस्ट वर्जन तपासू शकता. डेस्कटॉप युजरला लेटेस्ट अपडेट डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल. इथे क्लिक करुन नवं वर्जन डाउनलोड आणि इन्स्टॉल करू शकाल.

First published:

Tags: Cyber crime, Google, Tech news