Home /News /technology /

व्यक्तीने Loan App द्वारे घेतलं होतं कर्ज, काही दिवसांत झाला हजारोंचा Online Fraud

व्यक्तीने Loan App द्वारे घेतलं होतं कर्ज, काही दिवसांत झाला हजारोंचा Online Fraud

एका व्यक्तीने लोन अ‍ॅपद्वारे (Loan App) आठ हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. परंतु त्याला तब्बल 60 ते 70 हजारांचा फटका बसला.

  नवी दिल्ली, 21 जानेवारी : मागील काही वर्षात ऑनलाइन फ्रॉडची (Online Fraud) प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. एखाद्या लिंकवरुन, App वरुन फ्रॉड झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. असाच आणखी एक प्रकार नुकताच उघड झाला असून एका लोन अ‍ॅपद्वारे (Loan App) व्यक्तीची मोठी फसवणूक झाली आहे. बिहारमध्ये एका व्यक्तीने लोन अ‍ॅपद्वारे (Loan App) आठ हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. परंतु त्याला तब्बल 60 ते 70 हजारांचा फटका बसला. त्या व्यक्तीला महिन्याभरात 9 हजार रुपये परत करण्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर काही दिवसांत त्या व्यक्तीला App वाल्यांकडून धमकीचे कॉल येऊ लागले. सुरुवातीला कॉल करणाऱ्या व्यक्तीने आठवडाभरात 13 हजार रुपये परत करण्याचं सांगितलं. कर्ज घेतलेल्या व्यक्तीने App वर तपासणी केली असता, त्याच्या कर्जाबाबत कोणतीही माहिती दाखवली जात नव्हती. त्याला कॉलसह आता व्हॉट्सअ‍ॅपवरही (WhatsApp) वरही धमक्या मिळू लागल्या. लोन कंपनीकडून कर्ज घेतलेल्या व्यक्तीला मोबाइल फोनमधील फोटो, महत्त्वाचे डॉक्युमेंट, कॉन्टॅक्ट लिस्ट असे डिटेल्स WhatsApp वर पाठवण्यात येऊ लागले.

  हे वाचा - बाईक-स्कूटर घेण्याचा विचार करताय?Budget 2022-23 आधी जाणून घ्या ही महत्त्वाची बाब

  आपले पर्सनल फोटो आणि इतर माहिती कर्ज देणाऱ्या अ‍ॅपकडे पोहोचल्याचं पाहता व्यक्ती अतिशय घाबरला, त्याला एका आठवड्यात पैसे परत न केल्यास सर्व फोटो लीक केले जाण्याची धमकी दिली गेली. त्यानंतर या व्यक्तीने हा फसवणुकीचा प्रकार असल्याचं ओळखून याबाबतची माहिती सायबर सेलकडे (Cyber sale) दिली. सायबर सेलच्या कारवाईनंतर काही दिवस फोन कॉल येणं बंद झालं, परंतु पुन्हा धमकीचे फोन येऊ लागले. लोन अ‍ॅप कंपनीकडून धमक्यांद्वारे 60 ते 70 हजार रुपयांचा फ्रॉड करण्यात आला. देशात सायबर फ्रॉडची (Cyber Fraud) अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अनेकांची यात मोठी फसवणूक झाली आहे. असे अनेक अ‍ॅप्स आहेत, ज्याद्वारे फ्रॉडस्टर्स ऑनलाइन फसवणूक करतात.

  हे वाचा - Google Search: चुकूनही गुगलवर या गोष्टी सर्च करू नका, होऊ शकतं मोठं नुकसान

  काही फ्रॉडस्टर्सने कोणत्याही कागदपत्रांशिवाय गाडी घेण्यासाठी लोन दिलं आहे. अशाप्रकारचे अ‍ॅप कोणत्याही कागदी कारवाईशिवाय पाच मिनिटांत केवळ आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या आधारे लोन देण्याची ऑफर देतात. खराब सिबिल स्कोर असणाऱ्यांना इन्स्टंट लोन देण्याचं सांगून त्यांची फसवणूक करतात. मिळालेल्या माहितीनुसार, देशात सध्या 600 हून अधिक लोन देणारे फेक अ‍ॅप्स (Fake Apps) उपलब्ध आहेत. जर तुम्हीही असे अधिकृत नसलेले फेक अ‍ॅप डाउनलोड केले असतील, तर लगेच डिलीट करा. अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Apps, Instant loans, Online crime, Online fraud

  पुढील बातम्या