मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Google ने जारी केलं Android 12 अपडेट; आता स्मार्टफोन होणार सुपरफास्ट, हे असतील फीचर्स

Google ने जारी केलं Android 12 अपडेट; आता स्मार्टफोन होणार सुपरफास्ट, हे असतील फीचर्स

गूगलने Android 12 हे नवं अपडेट जारी केलं आहे. सध्या हे अपडेट Pixel च्या स्मार्टफोन्ससाठीच असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं आता या अपडेटचा फायदा पिक्सलचा स्मार्टफोन वापरणाऱ्या वापरकर्त्यांना होणार आहे.

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : गूगलने Android 12 हे नवं अपडेट जारी केलं आहे. सध्या हे अपडेट Pixel च्या स्मार्टफोन्ससाठीच असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं आता या अपडेटचा (Google releases Android 12 update) फायदा पिक्सलचा स्मार्टफोन वापरणाऱ्या वापरकर्त्यांना होणार आहे. Android 12 ची साईज ही 1.69GB इतकी असल्यानं आता हे अपडेट इतर स्मार्टफोन्समध्ये (smartphones) कधी येणार याची उत्सुकता वापरकर्त्यांमध्ये लागलेली आहे. या अपडेट्सचा उद्देश हा स्मार्टफोन्समधील सुरक्षा राखणं असल्यानं आता या अपडेटेशनची फार चर्चा होत आहे.

Google ने अधिकृरित्या Android 12 या अपडेटला Pixel 6 आणि Pixel 6 Pro मध्ये आणलेलं आहे. त्यामुळं आता या स्मार्टफोनमधील वॉलपेपर, मेनू आणि इतर नवीन ऑप्‍शन येणार आहेत. या अपडेटला Pixel 3A, Pixel 4, Pixel 4A, Pixel 4A 5G, Pixel 5 आणि Pixel 5A या स्मार्टफोनमध्येही लॉन्च करण्यात आलं आहे.

1 नोव्हेंबरपासून या स्मार्टफोनमध्ये बंद होणार WhatsApp;यात तुमचा फोन तर नाही ना?

सुरक्षेची हमी

या अपडेटेशनमध्ये वापरकर्त्यांच्या (Android 12  update) डाटा सुरक्षेची खास काळजी घेण्यात आली आहे. त्यामध्ये मागील 24 तासांमध्ये मोबाईलमधल्या अॅक्टिविटीजबद्दल माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळं वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनची सुरक्षा आणखी वाढणार आहे.

तुमच्या आधार कार्डसोबत किती नंबर आहेत लिंक; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

हे असतील फीचर्स

या अपडेटनंतर आता स्मार्टफोन यूजरने मागच्या 24 तासांमध्ये कोणत्या गोष्टींचा अथवा अॅप्सचा वापर मोबाईलमध्ये केला आहे, हे कळणार आहे. त्याचबरोबर पबजीसारखे हाय क्वालिटीज गेमही खेळता येणार आहे. त्यामुळं हे अपडेट वापरकर्त्यांना फायदेशीर ठरणार आहे. विशेष म्हणजे यात आपल्या सुरक्षेसंबंधीत सर्व पर्याय हे एकाच मेनूत असणार आहेत.

दिवाळीनिमित्त अमेझॉनवर या Smartwatch वर 75 टक्क्यांची सूट

सध्या हे अपडेट जरी गूगलने फक्त पिक्सल स्मार्टफोनसाठी आणलेले असले तरी आगामी काळात ते इतर स्मार्टफोन्ससाठी जारी करण्यात येईल असा अंदाज लावण्यात येत आहे.

First published:
top videos

    Tags: Google, Mobile Phone, Smartphone